जून महिना कोणत्या राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे, ते पाहूया!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:03 PM2021-05-31T16:03:35+5:302021-05-31T16:03:55+5:30
नोकरी,व्यवसाय ही उत्पन्नाची चाके येत्या महिन्याभरात वेग घेतील की काहीशी अडखळत चालतील, हे पाहण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊया.
कोरोना महामारीमुळे शासनाकडून निर्बंधांची तारीख पुढे पुढे सरकत चालली आहे. नव्या नियमानुसार लॉक डाऊन लागणार नसले, तरीदेखील १५ जून पर्यंत आधीच्या नियमांमध्ये थोडाफार फेरबदल होऊन दैनंदिन व्यवहार सुरू राहणार आहेत. त्यामुळे नोकरी,व्यवसाय ही उत्पन्नाची चाके येत्या महिन्याभरात वेग घेतील की काहीशी अडखळत चालतील, हे पाहण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊया.
मेष- मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना थोडा आर्थिक त्रासाचा राहील. व्यवसायात नफा नसेल. परंतु नोकरीमध्ये सहकार्य मिळेल. कृषी क्षेत्रात मध्यम स्वरूपाचे लाभ मिळतील. आईच्या आरोग्याची चिंता असेल. एखाद्या अज्ञात व्यक्तीच्या संपर्कातून रोजगाराच्या तसेच व्यवसाय वाढीच्या संधी उपलब्ध होतील.
तारीख २ आणि २० तारीख शुभ आहे. रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे फायद्याचे ठरेल.
वृषभ- वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना भौतिक आनंदाचा असेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. शेतीत यश मिळेल. नोकरीत सहकाऱ्यांबरोबर थोड्याशा अडचणी येतील. तसेच आरोग्याशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतील. संयमाने काम करा. तीर्थक्षेत्री जाण्याची संधी मिळेल. मातृसौख्य लाभेल.
१२,२९ तारीख शुभ आहे. गणेशाची उपासना केल्यास फायदा होईल.
मिथुन - मिथुन राशीसाठी हा महिना चांगला असेल. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रात प्रगती होण्यासाठीही बर्याच संधी उपलब्ध होतील. व्यवसाय चांगला चालेल. बहिणीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल, जो तुमच्या बहिणीचे त्रास दूर करेल. मुलांचे आरोग्य सुधारेल, परंतु भविष्यात काही काळ त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल.
७,२१ तारखा शुभ आहेत. सूर्यमंत्राचा जप किंवा सूर्यनमस्कार केल्यास फायदा होईल.
कर्क- कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना कायद्याशी संबंधित गोंधळात टाकणारा असेल. व्यवसायात मध्यम लाभ मिळेल. कृषी क्षेत्रात सामान्य फायदा होईल. नोकरीमध्ये प्रगती होईल, परंतु स्थान बदलण्याची शक्यता आहे. एखाद्याला व्यवसायात भागीदारी करण्याची संधी मिळेल, परंतु अडचणी येऊ शकतात, म्हणून कोणतेही व्यवहार समजून उमजून करा. जोडीदारास नोकरीत अनेक फायदे मिळतील. घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे.
६ आणि १८ तारिख शुभ आहे. गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठण करावे.
सिंह - हा महिना सिंह राशिच्या व्यक्तींसाठी आनंदी असेल. नोकरीत सहका-यांचे सहकार्य मिळेल. शेतीत यश मिळेल. हा महिना वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा तसेच कुटुंबातील नवीन पाहुण्यांचा योग दर्शवितो. एखाद्या जुन्या मित्राशी नाते संबंध बिघण्याची शक्यता आहे, तुम्ही थोडे सबुरीने घेत चला.
१४, २३ तारखा शुभ आहेत, शिवाची उपासना केल्यास फायदा होईल.
कन्या- कन्या राशीसाठी हा महिना राजकारणात यश येणारा आहे. व्यवसाय ठीक राहील. शेतीत यश मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. वडिलांचे आरोग्य सुधारेल परंतु कुटुंबात थोडाफार ताण राहील. मातृ बाजूकडून सहकार्य मिळेल. एखाद्या महिलेकडून समस्या येऊ शकतात, ज्याचे कायद्याने निराकरण केले जाईल. मानसिक तणावातून आराम मिळेल.
१८ तारीख शुभ आहे. गणेश पूजा करणे फायद्याचे ठरेल.
तुला- तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यातील जोडीदारांसाठी हा महिना त्रासदायक असेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. कृषी क्षेत्रात कोणत्याहीशेजाऱ्याचे सहकार्य असेल, परंतु कुटुंबात मतभेद होण्याची स्थिती असू शकते. नोकरीत बढती मिळू शकेल. मुलाशी संबंधित आनंद मिळेल. आईला अचानक आरोग्याचा त्रास होऊ शकतो.
१०,१९ तारखा शुभ आहेत. शक्तीची उपासना केल्यास फायदा होईल.
वृश्चिक- वृश्चिक राशीच्या कुटुंबाला फायदा होईल. व्यवसाय चांगला होईल नोकरीमध्ये प्रगती होईल. कृषी क्षेत्रात सामान्य फायदा होईल. आईला आरोग्याशी संबंधित समस्या असतील. वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल. नातेवाईकाशी वाद संपतील. जोडीदारास रोजगारामध्ये अडचणींचा सामना करावा लागेल. भावाला चांगला आर्थिक लाभ मिळेल.
८,२६ तारिख शुभ आहे . विष्णूंची उपासना केल्यास फायदा होईल.
धनु- धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना भौतिक आनंदाचा असेल. प्रथम सामान्य नंतर व्यवसायात यशस्वी वाटचाल होईल. नोकरीमध्ये प्रगती होईल. तसेच एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यांबरोबरकाम करण्याची संधी मिळू शकेल. कृषी क्षेत्रातही प्रगती होईल. हा महिना वाहनचालकांना त्रासदायक ठरू शकतो, लक्ष देणे आवश्यक आहे. नातेवाईकाचे सहकार्य मिळेल. वडिलांना आर्थिक लाभ मिळेल.
४,२२ तारखा शुभ आहेत. राधाकृष्णाची उपासना केल्यास फायदा होईल.
मकर- मकर राशीसाठी हा महिना उपयुक्त ठरेल. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. नोकरीत तुम्हाला सहकार्यांचे सहकार्य मिळेल. कृषी क्षेत्रात मध्यम लाभ होतील. आईद्वारे धार्मिक विधीत सहभागी व्हाल. वडिलांच्या आर्थिक प्रगतीत यश मिळेल. जमीन व मालमत्तासंबंधित कामात अडथळे निर्माण होतील. काही कौटुंबिक अडचणी निर्माण होतील.
१८,२७ तारखा शुभ आहेत, गुरूंची आराधना लाभदायक ठरेल.
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप आनंददायी असेल. व्यवसायात किरकोळ त्रास होईल. नोकरीमध्ये सामान्य जीवन मिळेल. कृषी क्षेत्रात चांगले फायदे होतील. मुलांचे विवाह ठरतील. तुमच्या जोडीदारास नोकरीत त्रास होऊ शकतो. सासरच्या बाजूकडून सहकार्य मिळेल. एखाद्या अज्ञात व्यक्तीशी संपर्क करणे वेदनादायक ठरू शकते.
३ आणि १२ तारीख शुभ आहे. कृष्णाची पूजा केल्यास फायदा होईल.
मीन- मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित फळ देणारा असेल. व्यवसायात चढ उतार असतील. कृषी क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत सहकाऱ्यांचा त्रास होईल. आपल्याला आरोग्याशी संबंधित समस्या असतील, तर काळजी घ्या व वेळेत उपचार घ्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मुलांचा रोजगार वाढेल. कोणत्याही धार्मिक क्षेत्राची जबाबदारी मिळू शकते. आर्थिक सम्येत वाढ होईल.
१,२८ तारखा शुभ आहेत, सूर्य उपासना केल्यास फायदा होईल.