स्वामींनी सांगितलेल्या चार गोष्टी लक्षात ठेवून दिवसाची प्रसन्न सुरुवात करूया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 08:00 AM2021-02-10T08:00:00+5:302021-02-10T08:00:07+5:30
सुंदर विचारांचे अलंकार ल्यायलेली व्यक्ती सुंदर दिसते व सुंदर वागते.
स्वामीनी आपल्याला वैचारिक चार रत्न दिली आहेत.विचारांचे अलंकार घालणे केव्हाही चांगलेच. ते चोरीला गेले, तरी ज्याने चोरले त्याचेही भले आणि ज्याचे चोरले गेले त्याचेही भले. या अमूल्य रत्नांचा ठेवा स्वतःकडे बाळगूया.
पहिले रत्न आहे...माफी
तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलूद्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करु नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका.उलट त्यांना माफ करा.
दुसरे रत्न....विसरून जाणे
आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा,लोभ ठेवू नका. कारण अपेक्षाभंगाचे दुःख वाईट असते.
तिसरे रत्न.....विश्वास
नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असे म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे...
चौथे रत्न.....वैराग्य
नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो, तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगुर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका.