आनंदी पालकत्व विषयावर प्रल्हाद वामनराव पै यांचे live मार्गदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 07:20 AM2020-12-17T07:20:00+5:302020-12-17T07:20:02+5:30

आनंदी पालकत्व' या चर्चासत्रातून आपल्यालाही त्यांच्याकडून यशस्वी जीवनाची अनेक सूत्र जाणून घेता येतील. या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि १८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनलला लॉग इन करा.

Live guidance of Pralhad Wamanrao Pai on the subject of happy parenting | आनंदी पालकत्व विषयावर प्रल्हाद वामनराव पै यांचे live मार्गदर्शन 

आनंदी पालकत्व विषयावर प्रल्हाद वामनराव पै यांचे live मार्गदर्शन 

googlenewsNext

आपण एकत्र राहतो, पण एकत्र आहोत का? विशेषतः मुले आपल्या पालकांपासून मनाने दुरावत आहेत. मुलांना हर तऱ्हेच्या सुख सुविधा देऊनही पाल्य आणि पालकांमधील दरी मिटत नाहीये. इन मिन तीन ते चार जणांचे कुटुंब. त्यातही मतभेद असतील, तर घराला घरपण राहणार तरी कसे? कुटुंब स्वास्थाचा हा मुद्दा उपस्थित करून, अभिनेत्री नेहा शितोळे १८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री. प्रल्हाद वामनराव पै यांच्याशी लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर संवाद साधणार आहेत. 

श्री. प्रल्हाद पै हे आपल्याला ज्येष्ठ निरुपणकार म्हणून परिचित आहेत. ते सद्गुरू श्री वामनराव पै यांचे चिरंजीव आहेत. जीवनविद्या तत्वज्ञानाचे ही सद्गुरू वामराव पै यांनी सुरु करून दिलेल्या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. वडिलांप्रमाणे प्रल्हाद पै यांनाही तत्वज्ञानाची आवड आहे. कारण तत्वज्ञान हे वैज्ञानिक, व्यावहारिक आणि प्रत्येक जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते. जीवनविद्या तत्वज्ञान हे मानसशास्त्र, परजीवी विज्ञान आणि मेटाफिजिक्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून समुपदेशन सत्रे घेतली आहेत आणि जीवनविद्या तत्वज्ञानाची तत्त्वे लागू करून सामान्य माणसाचे जीवन उन्नतीत आणण्यास मदत केली आहे.

त्यामुळे 'आनंदी पालकत्व' या चर्चासत्रातून आपल्यालाही त्यांच्याकडून यशस्वी जीवनाची अनेक सूत्र जाणून घेता येतील. या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि १८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनलला लॉग इन करा.

Web Title: Live guidance of Pralhad Wamanrao Pai on the subject of happy parenting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.