'लॉकडाउन अन् कौटुंबिक स्वास्थ्य', प्रल्हाद वामनराव पै यांचं मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 09:52 AM2020-06-24T09:52:26+5:302020-06-24T11:14:43+5:30
जेष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून लॉकडाउन आणि कौटुंबिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. या चर्चासत्रात अभिनेत्री गिरीजा ओक यांचाही विशेष सहभाग असणार आहे.
मुंबई - कोरोना महामारीच्या काळात देशातील नागरिकांना लॉकडाउनचा सामना करावा लागला आहे. लॉकडाउन काळात आपला काम-धंदा आणि नोकरी सोडून घरातच वेळ घालवावा लागला आहे. अनेकांनी या वेळेचा सदुपयोग केला आहे. आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत कौटुंबिक आनंद घेण्याचा प्रयत्न अनेकांना केला. मात्र, काहींना या लॉकडाउन काळात मानिसक तणावाला सामोरे जावे लागले आहे. त्याच विषयावर लोकमतच्या भक्ती या युट्युब चॅनेलवर लॉकडाउन आणि कौटुंबिक स्वास्थ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे.
ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून लॉकडाउन आणि कौटुंबिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. या चर्चासत्रात अभिनेत्री गिरीजा ओक यांचाही विशेष सहभाग असणार आहे. लोकमतच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना गुरुवार 25 जून रोजी सायंकाळी 8 वाजता भक्ती या युट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. लॉकडाउनचा आपल्या मनावर झालेला परिणाम आणि लॉकडाउन काळातील मानसिक तणावातून कसं बाहेर यावं, यावरही चर्चापर मार्गदर्शन होणार आहे. लॉकडाउनच्या काळातील कौटुंबिक स्वास्थ्य जपताना, पुढील काळातही कुटुंबात एकत्रितपणे वावरताना कशी काळजी घ्यायची, यावरही चर्चा होईल. त्यामुळे, वाचकांनी व दर्शकांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन आपल्या शंकांचं निरसन करावे.