भगवान शंकरांनी त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही तिसरा डोळा दिला आहे, त्याचा वापर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 07:00 AM2022-12-26T07:00:00+5:302022-12-26T07:00:01+5:30

शिव शंभूच्या उपासनेने आपल्याकडे असलेला दिव्य नेत्र आपल्याला उघडता येतो, याबाबत सांगताहेत सद्गुरू. 

Lord Shankar has given us a third eye like him, learn how to use it! | भगवान शंकरांनी त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही तिसरा डोळा दिला आहे, त्याचा वापर जाणून घ्या!

भगवान शंकरांनी त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही तिसरा डोळा दिला आहे, त्याचा वापर जाणून घ्या!

googlenewsNext

सद्गुरु सांगतात, उपासना करायची तर सुरुवात उपासाने करायला हवी. उपास कशाचा? तर ज्या गोष्टींमध्ये मन अडकलेले असते, अशा सर्व गोष्टींचा उपास. त्यातल्या त्यात आहारात आपले मन जास्त अडकलेले असते. भूकेवर नियंत्रण ठेवले, तर मन आहारात गुंतून राहत नाही. पोट रिकामे असले, की बुद्धी जड होत नाही. अन्य विचारांना चालना मिळते. ऐहिक सुखात गुंतलेले मन बाहेर पडून पारमार्थिक सुखाकडे झेपावते. म्हणून सुरुवात उपासाने. 

उपासाला उपासनेची जोड देण्यासाठी स्तोत्र, मंत्र, जप अशा धार्मिक गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे देहाबरोबर मन विधींमध्ये गुंतून राहते आणि अन्य विचार डोक्यात शिरकाव करत नाहीत. म्हणून उपास, पूजा आणि विधी यांना महत्त्व आहे. 

शिवशंकराला तीन डोळे आहेत असे आपण म्हणतो. पैकी तिसरा डोळा उघडला, तर प्रलय येईल असेही आपण ऐकले आहे. हा तिसरा डोळा केवळ प्रलय घडवण्यासाठी नाही, तर वाईट वृत्तीचा, विचारांचा, विकारांचा नाश करण्यासाठी आहे. तो केवळ शिवशंकराला नाही, तर आपल्या सर्वांना अदृश्य स्वरूपात आहे. त्या तिसऱ्या डोळ्याने स्वत:च्या आयुष्यात डोकावून पहा. वाईट विकारांवर तृतीय नेत्रातून प्रहार करा. विकारी आणि अतिविचारी मनावर आवर घाला. 

ध्यानधारणा आपल्या हृदयात स्थित जीव आणि शिवाची सांगड घालून देणारी असते. तो अनुभव जरूर घ्या. ध्यानधारणा आपल्याला तिसऱ्या डोळ्याची अर्थात अंतर्दृष्टीची प्रचिती देते. दुसऱ्यांच्या आयुष्यात खूप डोकावून झाले, आता थोडे स्वत:च्या आयुष्यात डोकावून पहा. हा तिसरा डोळा तुम्हाला कायमस्वरूपी जागे करील. 

Web Title: Lord Shankar has given us a third eye like him, learn how to use it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.