येथे अजुनही धडधडते भगवान श्रीकृष्णाचे हदय, आहे फारच रंजक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 04:54 PM2022-05-19T16:54:14+5:302022-05-19T16:55:02+5:30

शरीराचा त्याग केल्यावर सर्व लोकांच्या हृदयाचे ठोके देखील थांबतात, परंतु भगवान श्रीकृष्णांनी शरीर सोडले, पण त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. तुमचा यावर विश्‍वास बसणार नाही, पण पुराणात आणि काही घटनांमध्‍ये दिलेल्‍या माहिती या सत्‍यासमोर तुम्ही देखील नतमस्तक व्हाल.

lord shrikrshna heart still beating in this temple mythological story | येथे अजुनही धडधडते भगवान श्रीकृष्णाचे हदय, आहे फारच रंजक कारण

येथे अजुनही धडधडते भगवान श्रीकृष्णाचे हदय, आहे फारच रंजक कारण

googlenewsNext

जगभरासाठी भारत हे श्रद्धेचे केंद्र आहे. भारतात अनेक रहस्यमय मंदिरे आहेत. या मंदिरांचे रहस्य वैज्ञानिक सुद्धा शोधू शकलेले नाहीत. आम्ही आज तुम्हाला अशाच एका गुपिताबद्दल सांगणार आहोत. भारतात असे एक रहस्यमय मंदिर आहे, जिथे आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय धडधडते. शरीराचा त्याग केल्यावर सर्व लोकांच्या हृदयाचे ठोके देखील थांबतात, परंतु भगवान श्रीकृष्णांनी शरीर सोडले, पण त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. तुमचा यावर विश्‍वास बसणार नाही, पण पुराणात आणि काही घटनांमध्‍ये दिलेल्‍या माहिती या सत्‍यासमोर तुम्ही देखील नतमस्तक व्हाल.

द्वापर युगात भगवान श्री हरी श्री विष्णू श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले, तेव्हा ते त्यांचे मानव रूप होते. सृष्टीच्या नियमांनुसार, प्रत्येक मानवाप्रमाणे, या स्वरूपाचा मृत्यू निश्चित होता. महाभारत युद्धाच्या ३६ वर्षानंतर भगवान श्रीकृष्णाने देह सोडला. जेव्हा पांडवांनी त्यांचे अंतिम संस्कार केले, तेव्हा श्रीकृष्णाचे संपूर्ण शरीर अग्नीत दहन झाला, परंतु त्यांचे हृदय धडधडत होते. अग्नी ब्रह्मदेवाचे हृदय जाळू शकला नाही. हे दृश्य पाहून पांडव स्तब्ध झाले. तेव्हा आकाशातून आवाज आला की हे ब्रह्मदेवाचे हृदय आहे, ते समुद्रात वाहू द्या. यानंतर पांडवांनी भगवान श्रीकृष्णाचे हृदय समुद्रात सोडले.

ओडिशातील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिरात भाऊ बलदौ आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत बसलेल्या भगवान कृष्णाशी अनेक रहस्ये जोडलेली आहेत. हे मंदिर अतिशय चमत्कारिक आहे. या मंदिरासमोर आल्यावर वाऱ्याची दिशाही बदलते. असे म्हणतात की वारा आपली दिशा बदलतात, कारण त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाज मंदिराच्या आत जाऊ शकत नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत एक पाऊल टाकताच समुद्राचा आवाज थांबतो. मंदिराचा ध्वजही नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो.

श्री जगन्नाथ मंदिरातील मूर्तीमध्ये आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय आहे. परमेश्वराच्या हृदयाच्या या भागाला ब्रह्म पदार्थ म्हणतात. भगवान श्री जगन्नाथाची मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून बनविली जाते आणि दर १२ वर्षांनी भगवान जगन्नाथजींची मूर्ती बदलल्यावर जुन्या मूर्तीतून हा ब्रह्म पदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो. जेव्हा हा विधी केला जातो, तेव्हा त्या वेळी संपूर्ण शहराची वीज खंडित केली जाते. यानंतर, मूर्ती बदलणारा पुजारी देवाचा चेहरा बदलतो. या मूर्तीखाली आजही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते, असे म्हटले जाते.

भगवान श्रीकृष्णाचे हृदय बदलताना पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि हातात हातमोजे घातले जातात. चुकून कुणी पाहिले, तर त्याचा मृत्यू होतो, अशी यामागे श्रद्धा आहे. त्यामुळे विधी करण्यापूर्वी पूर्ण दक्षता घेतली जाते. मूर्ती बदलणारे पुजारी सांगतात की, जेव्हा ही प्रक्रिया केली जाते, त्या वेळी ससा उडी मारल्याचा भास होतो.

Web Title: lord shrikrshna heart still beating in this temple mythological story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.