अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले! स्वप्नात दिसला मोर तर आहेत 'हे' शुभ संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:00 PM2022-08-18T18:00:04+5:302022-08-18T18:02:11+5:30
बऱ्याचदा आपल्याला स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी अर्थ असतो. किंवा भविष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचे ते संकेत असतात असेही मानले जाते. आज आम्ही तुम्हाला स्वप्नात मोर दिसल्यास त्याचा काय अर्थ होतो हे सांगणार आहोत.
आपल्याला अनेकदा स्वप्न पडतात त्यात आपण वेगवेगळ्या गोष्टी किंवा माणसं पाहतो. आपल्याला त्याचा अर्थ लावता येत नाही. मात्र बऱ्याचदा आपल्याला स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी अर्थ असतो. किंवा भविष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचे ते संकेत असतात असेही मानले जाते. आज आम्ही तुम्हाला स्वप्नात मोर दिसल्यास त्याचा काय अर्थ होतो हे सांगणार आहोत.
मोर आणि लांडोर यांना एकत्र पाहणे म्हणजे प्रेम
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मोर आणि लांडोर यांना एकत्र पाहत असाल तर ते अनेक वेळा चांगले परिणाम देते. प्रेमसंबंधांसाठी ते चांगले मानले जाते. अशी स्वप्ने पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमचे तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध आहेत आणि प्रेमही वाढेल.
स्वप्नात शनी देवासोबत मोर दिसणे
जर तुम्हालाही स्वप्नात शनी देव मोरासोबत दिसले तर असे स्वप्न खूप चांगले मानले जाते. शनि चालिसानुसार असे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धनलाभ होईल. प्रगतीच्या अनेक संधीही मिळतील.
साप आणि मोराची झुंज पाहणे
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात साप आणि मोराचे भांडण पाहत असाल तर अशी स्वप्ने तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. स्वप्न शास्त्रानुसार अशी स्वप्ने पडणे म्हणजे तुमच्या शत्रूंमध्ये घट होते. जेव्हा अशी स्वप्ने येतात तेव्हा तुमचे शत्रू तुमच्याविरुद्ध रचत असणारे कट फसतील.
पांढरा मोर पाहणे म्हणजे श्रीमंत होणे
जर स्वप्नात पांढऱ्या रंगाचा मोर दिसला तर हे स्वप्न खूप आनंददायी मानले जाते. अशी स्वप्ने पाहणे तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देतात. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे. स्वप्नात पांढरा मोर पाहणे म्हणजे अचानक कुठूनतरी पैसा मिळणे.