Chandra Grahan 2025: या वर्षाचे पहिले खग्रास चंद्रग्रहण तेही होळीला; गर्भवतींसाठी काळजीचे कारण? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:20 IST2025-03-05T11:20:36+5:302025-03-05T11:20:57+5:30
Lunar Eclipse 2025 : यंदा १४ रोजी खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे, पण ते भारतातून दिसणार का? गर्भवतींना काळजीचे कारण आहे? कोणते नियम पाळावेत ते जाणून घ्या!

Chandra Grahan 2025: या वर्षाचे पहिले खग्रास चंद्रग्रहण तेही होळीला; गर्भवतींसाठी काळजीचे कारण? वाचा!
या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण मार्च महिन्यात होणार आहे. ग्रहण या शब्दाला नकारात्मक छटा आहे. कारण ग्रहण अर्थात ग्रासून टाकणे. ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू हे पाप ग्रह अधिक सक्रिय होतात आणि त्यांचा प्रभाव वाढतो. अशा परिस्थितीत या वर्षातील पहिले चंद्रग्रहण केव्हा होईल आणि ते कुठे दिसेल हे जाणून घेऊया.
या वर्षातील पहिले चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा जेव्हा ग्रहण लागते तेव्हा ग्रहणासंबंधी नियम पाळले जातात. मात्र येत्या चंद्रग्रहणाचा प्रभाव भारतावर पडणार का आणि पडल्यास त्याबाबतीत कोणती सतर्कता बाळगावी लागणार ते पाहू.
२०२५ चे पहिले चंद्रग्रहण कधी होईल?
२०२५ चे पहिले चंद्रग्रहण मार्चमध्येच होणार आहे. होळीच्या (Holi 2025) दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा (Falgun Purnima 2025) तिथीला अर्थात १४ मार्चला चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2025) असणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल.
वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार का?
हे ग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण उत्तर अमेरिका (कॅनडा, अमेरिका), दक्षिण अमेरिकेत खग्रास आकारात पाहता येईल. युरोपातील बहुतेक देशांमध्ये (ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, पोर्तुगाल, स्पेन इ.), पूर्व दक्षिण अमेरिका आणि बहुतेक पश्चिम आफ्रिकेमध्ये हे ग्रहण चंद्रास्ताच्या वेळी आंशिक स्वरूपात दिसेल. तर बहुतेक ऑस्ट्रेलिया (मेलबर्न, सिडनी इ.), पूर्व आशिया (जपान, दक्षिण कोरिया), फिजी इत्यादी देशांत हे ग्रहण चंद्रोदयाच्या वेळी खंडग्रास स्वरूपात पाहता येईल. हॉलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, उत्तर रशिया, स्पेन, सुरीनाम, स्वीडन, स्वित्झर्लंड, युक्रेन, अमेरिकेचा पूर्व भाग (न्यूयॉर्क इ.), आणि इंग्लंड इ. खग्रास ग्रहण दिसेल.
गर्भवतींसाठी विशेष सूचना :
हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्यासंदर्भात कोणतेही नियम पाळणे बंधनकारक असणार नाही. त्यामुळे स्वाभाविकच होळीच्या सणावर, आनंदावर त्याचे विरजण पडणार नाही. केवळ गर्भवतींनी या काळात आरोग्याची काळजी घ्यावी, मन शांत ठेवावे ज्योतिषी सांगतात. ग्रहण काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यात गर्भवती स्त्रिया दोन जीवांचा सांभाळ करत असतात. बाह्य स्थितीचा त्यांच्या तना-मनावर परिणाम होतो, म्हणून त्यांनी विशेष काळजी घ्यावी असे सुचवले जाते.
२०२५ च्या चंद्रग्रहणाची वेळ : भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी २:२१ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:१४ वाजता संपेल. ग्रहणाचा मधला काळ दुपारी ४:१७ मिनिटांनी असेल.
खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय?
खग्रास चंद्रग्रहण म्हणजे ज्या ग्रहणात चंद्राचा काही भाग झाकोळलेला दिसतो, अशा ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात.