Magical Mantra: संपूर्ण श्रीमद्भागवताचे सार सामावले आहे 'या' एका श्लोकात; रोज म्हणा आणि पापमुक्त व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 07:00 AM2023-04-29T07:00:00+5:302023-04-29T07:00:07+5:30

Magical Mantra: भगवान श्रीकृष्णाच्या अपार लीलांनी युक्त असलेले श्रीमद्भागवत नुसते ऐकले, वाचले तरी पापक्षालन होते, हा श्लोक रोज म्हटला तर किती पुण्यसंचय होईल बघा!

Magical Mantra: The essence of the entire Srimad Bhagavata is contained in this one verse; Say it daily and be sin free! | Magical Mantra: संपूर्ण श्रीमद्भागवताचे सार सामावले आहे 'या' एका श्लोकात; रोज म्हणा आणि पापमुक्त व्हा!

Magical Mantra: संपूर्ण श्रीमद्भागवताचे सार सामावले आहे 'या' एका श्लोकात; रोज म्हणा आणि पापमुक्त व्हा!

googlenewsNext

हिंदू धर्मग्रंथानुसार श्रीमद भागवत पठण केल्याने पुण्य मिळते आणि पापाचा नाश होतो. रोज भागवत पठण केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्याची शक्ती प्राप्त होते असे म्हणतात. तसेच मानवी जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाल्याने मनुष्याचा आत्मविश्वास वाढतो.  म्हणून भागवत प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असा धर्मशास्त्राचा आग्रह आहे. मात्र जर तुमच्याकडे भागवत वाचण्यासाठी दररोज पुरेसा वेळ नसेल, तर फक्त एक श्लोक म्हणा, कारण त्यात संपूर्ण भागवत एकवटले आहे. तसे केल्याने केल्याने तुम्हाला संपूर्ण श्रीमद भागवत वाचण्याचे फळ मिळू शकते. त्या श्लोकाबद्दल जाणून घेऊया. 

श्लोकरूपी भागवत 

आदौ देवकी देव गर्भजननं, गोपी गृहे वद्र्धनम्।
माया पूज निकासु ताप हरणं गौवद्र्धनोधरणम्।।
कंसच्छेदनं कौरवादिहननं, कुंतीसुपाजालनम्।
एतद् श्रीमद्भागवतम् पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम्।।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण:दामोदरं वासुदेवं हरे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे।।

श्लोकाचा अर्थ: 

याचा अर्थ भगवान कृष्णाचा जन्म देवकीच्या पोटी झाला, गोपी-ग्वालांसह वाढला, त्याने पूतनेचा वध केला, गोवर्धन पर्वत उचलला, कंसाचा वध केला, कुंतीच्या पुत्रांचे म्हणजेच पांडवांचे रक्षण केले, कौरवांचा नाश केला, अशा प्रकारे कृष्णाने आपल्या अवतार कार्यात आपल्या लीला दाखवल्या. 

हा श्लोक म्हणण्याची पद्धत 

हे श्लोक म्हणणे  शुभ आणि फलदायी ठरते ठरते. हा श्लोक रोज श्रद्धेने म्हटला, तर व्यक्तीला श्रीकृष्ण कृपेने जीवनातील सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. या श्लोकामुळे पापक्षालन होते आणि पाप करण्यासाठी मन धजावत नाही. सकाळी उठून स्नान करून पूजा करावी. यानंतर हा श्लोक म्हणावा आणि रात्री झोपण्यापूर्वी या श्लोकाचे पुनरुच्चारण करावे. 

Web Title: Magical Mantra: The essence of the entire Srimad Bhagavata is contained in this one verse; Say it daily and be sin free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.