Maha Shivratri 2022 : वास्तू दोष दूर करायचे असतील तर महाशिवरात्रीला करा वास्तू शास्त्रात दिलेले 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 01:22 PM2022-02-19T13:22:52+5:302022-02-19T13:23:47+5:30
Maha Shivratri 2022 : यंदा महाशिवरात्री १ मार्च रोजी साजरी होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत.
माघ वद्य चतुर्दशीला वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री साजरी केली जाते, तिलाच आपण महाशिवरात्री असे म्हणतो. या दिवशी मोठ्या उत्साहाने सर्वत्र
महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा केली जाते. तसेच आपण केलेली पूजा महादेवांपर्यंत पोहोचली तर इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यासाठी शिवलिंगावर दूध, चंदन, भस्म, भांग, धोतऱ्याची फुले इत्यादी अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. या पूजेलाच जोड द्यायची आहे एका उपासनेची, जेणेकरून त्या उपासनेच्या प्रभावाने आपले वास्तू दोष मिटतील. ती उपासना कोणती हे जाणून घेउ.
यंदा महाशिवरात्री १ मार्च रोजी साजरी होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत.
महा शिवरात्रीचे उपाय
>>महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला अभिषेक करून जलधारीचे पाणी घरी आणावे. यानंतर 'ओम नमः शांभवाय च, मायोभवाय च नमः शंकराय च'. या मंत्राचा जप करत ते तीर्थ घरभर शिंपडावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते.
>>एकाच घरात आपसी कलह, रोगराई किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते, त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते.
>>घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेलचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो.
>>घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते.
>>यादिवशी शंकराला बिल्व पत्र वाहावे. रुद्राभिषेक सुरु असताना मनोमन ओम नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व दल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते.
>>शिवरात्रीच्या दिवशी शंकराला दही भाताचा नैवेद्य दाखवावा, तसेच एखाद्या गरज वंताला पोटभर अन्न किंवा शिधा द्यावा. त्यामुळेदेखील वास्तू पीडा कमी होते.