Mahadev Mantra: महादेवाचे 'हे' पाच मंत्र आवर्जून म्हणा आणि विविध अडचणींवर मात करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 02:59 PM2022-11-28T14:59:33+5:302022-11-28T14:59:52+5:30

Somwar Upasna: उपासना जेवढी मनोभावे कराल तेवढे फळ लवकर मिळते, त्या उपासनेला योग्य दिशा मिळावी म्हणून मंत्रांची जोड पुढीलप्रमाणे...!

Mahadev Mantra: Chant 'these' five mantras of Mahadev and overcome various difficulties! | Mahadev Mantra: महादेवाचे 'हे' पाच मंत्र आवर्जून म्हणा आणि विविध अडचणींवर मात करा!

Mahadev Mantra: महादेवाचे 'हे' पाच मंत्र आवर्जून म्हणा आणि विविध अडचणींवर मात करा!

googlenewsNext

इतर देवांच्या तुलनेत महादेव लवकर प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोळा सांब म्हणतात. तसेच आपल्या प्रार्थनेने लवकर संतुष्ट होतात म्हणून  असेही म्हणतात. मात्र केवळ संकटकाळी देवाची उपासना करणे योग्य नाही. उपासना सदा सर्वदा केली तरच ती अडीअडचणीत कामी येते. सोमवार हा महादेवाला वाहिलेला वार असल्याने महादेवाच्या नित्य उपासनेत म्हणता यावेत असे पाच श्लोक जाणून घ्या!

मंत्र अतिशय सोपे आहेत, फक्त ते मनोभावे जप करणे महत्त्वाचे आहेत. केवळ आज नाही तर नामस्मरणाचा ठेवा सातत्याने जपावा!

-महादेवाला प्रसन्न करणारे मंत्र

ओम नमः शिवाय

आपल्या माहितीतला तरी अतिशय परिणामकारक हा मंत्र भगवान शिवाच्या चमत्कारी मंत्रांपैकी एक आहे. असे मानले जाते की या मंत्राचा नियमित १०८ वेळा जप केल्याने व्यक्तीचे मन शांत होते. तसेच भगवान शंकराची कृपा प्राप्त होते.

ओम नमो भगवते रुद्राय नमः

शास्त्रात या मंत्राला रुद्र मंत्र असेही म्हणतात. इप्सित मनोकामना पूर्तीसाठी हा मंत्र विशेष फलदायी ठरतो. 

ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम् पुष्टीवर्धनम्।
उर्वरुकमिव बंधनानमृत्योरमुखिय्य ममृतत् ||

हा मंत्र शिवाच्या शक्तिशाली मंत्रांमध्ये देखील समाविष्ट आहे. याला शिवाचा महामृत्युंजय मंत्र म्हणतात. या मंत्राचा जप केल्याने भय, मृत्यू आणि अनिश्चितता यापासून मुक्ती मिळते.

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि
तन्नो रुद्रः प्रचोदयात्!

जीवनात सुख-शांती मिळविण्यासाठी शास्त्रात अनेक मंत्र सांगण्यात आले आहेत. शिव गायत्रीचा हा मंत्र खूप चमत्कारिक आहे. याच्या जपाने माणसाच्या जीवनात कमालीची मनःशांती मिळते. 

करचरणकृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसंवापराधं |
विहितं विहितं वा सर्व मेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो ॥

जर कळत नकळत झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागायची असेल तर या मंत्राचा जप करा. या मंत्राच्या जपाने भगवान शंकर प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देतात असे मानले जाते.

Web Title: Mahadev Mantra: Chant 'these' five mantras of Mahadev and overcome various difficulties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.