महाशिवरात्री: एकाच दिवशी ३ व्रते, तिप्पट पुण्य मिळेल; महादेवासह लक्ष्मी होईल प्रसन्न! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:36 PM2024-03-05T14:36:12+5:302024-03-05T14:36:55+5:30

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला तीन व्रतांचे आचरण करून शुभ पुण्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

mahashivratri 2024 get prosperity benefits of shukra pradosh lakshmi devi shukravar vrat worship along with lord shiva puja on maha shivratri 2024 | महाशिवरात्री: एकाच दिवशी ३ व्रते, तिप्पट पुण्य मिळेल; महादेवासह लक्ष्मी होईल प्रसन्न! 

महाशिवरात्री: एकाच दिवशी ३ व्रते, तिप्पट पुण्य मिळेल; महादेवासह लक्ष्मी होईल प्रसन्न! 

Mahashivratri 2024: महादेव शिवशंकरांच्या पूजनासाठी सर्वोत्तम मानला गेलेला दिवस म्हणजे महाशिवरात्री. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. मराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. यंदाच्या महाशिवरात्रीला अद्भूत शुभ योगांत शिवपूजनाचे पुण्य मिळणार आहे. महाशिवरात्रीच्या एकाच दिवशी तीन व्रते येत आहे. ही तीनही व्रतांचे आचरण केल्यास केवळ तिप्पट पुण्यलाभ मिळणार नाही, तर महादेवासह लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते आहे. 

सन २०२४ मध्ये ०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जाते. रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

महाशिवरात्रीला एकाच दिवशी कोणती तीन व्रते?

महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, सिद्धी योग, श्रवण नक्षत्राचा शुभ जुळून येत असून, कुंभ राशीत सूर्य, शनि आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिषीय दृष्टिने यंदा २०२४ मधील महाशिवरात्री अनेकार्थाने विशेष मानली जात असल्याचे सांगितले जात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी काही प्रमुख व्रते येत आहेत. एकाच वेळी अनेक व्रतांचे पुण्य प्राप्त होऊ शकते. महाशिवरात्रीला अनेक दुर्मिळ योग तयार होत आहेत, ज्याचा फायदा होऊ शकतो आणि कुंडलीतील ग्रह नक्षत्राची स्थिती मजबूत होऊ शकते. यंदा शुक्रवारी महाशिवरात्री येत आहे. लक्ष्मी देवीचे विशेष व्रत, प्रदोष आणि महाशिवरात्री अशी तीन व्रते करता येऊ शकतात. जाणून घेऊया...

शुक्र प्रदोष आणि महाशिवरात्रीचा योग

महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष व्रत करता येऊ शकेल. प्रदोष व्रत त्रयोदशीला केले जाते. ०७ मार्च रोजी रात्रौ ०१ वाजून २० मिनिटांनी त्रयोदशी सुरू होत असून, ०८ मार्च रोजी रात्री ०९ वाजून ५८ मिनिटांपर्यंत आहे. यामुळे प्रदोष तिथीचे व्रत ०८ मार्च रोजी केले जाईल. शुक्रवारी प्रदोष तिथी येत असल्याने हे व्रत शुक्र प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाईल. प्रदोष काळी विशेष पूजन केले जाते. तसेच या व्रताचरणामुळे शंकराचा शुभाशिर्वाद मिळेलच मात्र शुक्र ग्रहाचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते. ०८ मार्च रोजी प्रदोषकाळी हे व्रत आवर्जून करावे. 

शुक्रवारचे लक्ष्मी देवीचे विशेष व्रत

शुक्रवार हा लक्ष्मी देवीच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. तसेच शुक्रवार या दिवसावर शुक्र ग्रहाचा अंमल अधिक असतो, असे सांगितले जाते. महालक्ष्मी देवीची विशेष कृपा व्हावी, भरभराट होऊन वैभव, सुख-समृद्धी मिळावी, यासह आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळण्याचा मार्ग मिळावा, यासह अनेक कारणांसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रत केले जाते. महाशिवरात्रीला लक्ष्मी देवीचे शुक्रवारचे व्रत केले जाऊ शकते. यामुळे लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. 

महाशिवरात्रीचे विशेष व्रत

०८ मार्च रोजी माघ वद्य चतुर्दशी रात्रौ ०९ वाजून ५८ मिनिटांनी प्रारंभ होत असून, ०९ मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजून १८ मिनिटांपर्यंत असणार आहे. महाशिवरात्रीचा निशीथकाल ०८ मार्च रोजी मध्यरात्रौ १२ वाजून २५ मिनिटे ते उत्तररात्रौ ०१ वाजून १३ मिनिटे असणार आहे. सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रीय होते, यालाच निशीथकाल असे म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्यफलदायक असते, असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निशीथकालात प्रदोष शिवरात्री व्रत करावे, असे सांगितले जाते. महादेवासह पार्वती देवीचे पूजनही केले जाते. शुक्रवारी पार्वती देवीचे पूजन विशेष पुण्यफलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: mahashivratri 2024 get prosperity benefits of shukra pradosh lakshmi devi shukravar vrat worship along with lord shiva puja on maha shivratri 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.