महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायची इच्छा आहे? राशीनुसार निवडा; लाभेल महादेवाची अपार कृपा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 04:49 PM2024-03-07T16:49:01+5:302024-03-07T16:49:52+5:30

Mahashivratri 2024: राशीनुसार रुद्राक्ष धारण केला, तर त्याचे अनेक लाभ मिळू शकतात, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

mahashivratri 2024 these rudraksha will be lucky for you wear rudraksha as per zodiac signs according to astrology and get blessings of lord shiva | महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायची इच्छा आहे? राशीनुसार निवडा; लाभेल महादेवाची अपार कृपा

महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायची इच्छा आहे? राशीनुसार निवडा; लाभेल महादेवाची अपार कृपा

Mahashivratri 2024: ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने यथाशक्ती शंकराची आराधना, उपासना, नामस्मरण, व्रताचरण करत असतो. रुद्राक्ष एक शिवाचे प्रतीक आहे. रुद्राक्षाचे अनेक फायदे आहेत. केवळ धार्मिकदृष्ट्या नाही, तर आरोग्यासाठीही अनेकदा रुद्राक्ष वापरला जातो. रुद्राक्ष धारण करण्याची अनेकांची इच्छा असते. 

महाशिवरात्रीला शिवतत्त्व सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व कैक पटीने वाढते, असे मानतात. महाशिवरात्रीला अनेक जण आवर्जून रुद्राक्ष धारण करतात किंवा रुद्राक्ष माळ गळ्यात घालतात. रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम सांगितले जातात. शास्त्रशुद्ध पद्धतीनेच रुद्राक्ष किंवा रुद्राक्ष माळ धारण करावी, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, राशीनुसार रुद्राक्ष धारण केला, तर त्याचे अनेक लाभ मिळू शकतात, असे म्हटले जाते. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

तुमच्या राशीनुसार रुद्राक्ष धारण करा अन् अपार लाभ मिळवा

मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी तीन मुखी रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते. महादेवांच्या शुभाशिर्वादासह अनेकविध फायदे होऊ शकतात, असे म्हटले जाते.

वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे भाग्यवृद्धी होऊन समस्या, अडचणी दूर होऊ शकतात, असे सांगितले जाते.

मिथुन: या राशीचा स्वामी बुध आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावे. यश-प्रगती आणि समस्या दूर होण्यासाठी लाभदायक ठरू शकतो, असे म्हटले जाते. 

कर्क: या राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी दोन मुखी रुद्राक्ष धारण करावा. भाग्योदयासह कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होऊ शकते, असे मानले जाते. 

सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी बारा मुखी रुद्राक्ष धारण करावा. आव्हानांचा सामना करण्याचे बळ मिळू शकते. तसेच सूर्याची कुंडलीतील स्थिती मजबूत होऊ शकते, अशी मान्यता आहे. 

कन्या: या राशीचा स्वामी बुध आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावे. कामे सुलभतेने पार पडावीत, यश-प्रगती व्हावी, यासाठी फलदायी ठरू शकतो, असे सांगितले जाते.  

तूळ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे कामातील अडचणी, समस्या दूर होऊ शकतात. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात, असे सांगितले जाते.

वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी तीन मुखी रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते. महादेवांच्या शुभाशिर्वादासह धन-धान्य-वैभव लाभू शकते. कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होऊ शकते, असे म्हटले जाते.

धनु: या राशीचा स्वामी गुरु आहे. धनु राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश-प्रगती साध्य करता येऊ शकते. तसेच कुंडलीतील गुरु स्थिती मजबूत करता येऊ शकते, असे मानले जाते.

मकर: या राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनीचे आराध्य आहेत. मकर राशीच्या व्यक्तींनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावा. यशाचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. शंकरासह शनीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. शनीची कुंडलीतील स्थिती मजबूत होऊ शकते, अशी मान्यता आहे.

कुंभ: या राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनीचे आराध्य आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावा. समस्या, अडचणी दूर होऊ शकतात. महादेवांसह शनीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. शनीची कुंडलीतील स्थिती मजबूत होऊ शकते, असे सांगितले जाते.

मीन: या राशीचा स्वामी गुरु आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्षाचे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. तसेच कुंडलीतील गुरु स्थिती मजबूत करता येऊ शकते, असे मानले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

Web Title: mahashivratri 2024 these rudraksha will be lucky for you wear rudraksha as per zodiac signs according to astrology and get blessings of lord shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.