Mangal Astrology: मंगळ हा ग्रह कुंडलीत कोणत्या स्थानी आहे यावरून तो मंगल करणार की अमंगल ते ठरतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:36 PM2023-07-31T12:36:03+5:302023-07-31T12:36:30+5:30
Mangal Astrology: प्रत्येकाजवळ कुंडली असते, त्यात दिलेल्या तक्त्यानुसार तुमच्या राशीला आलेला मंगळ तुमच्यासाठी काय देणार आहे ते जाणून घ्या.
>> ज्योतिषी सोनाली लिखितकर
मंगळ या ग्रहाची भीती वाटली नाही असा माणूस विरळा...लहान मुलं जन्माला आले रे आले की प्रथम त्याला मंगळ तर नाही ना; हे पाहून घेतले जाते. लग्नाकरिता मंगळ असलेल्या मुलीची कुंडली आली की झुरळ झटकावे तसे सर्व जण त्या कुंडलीला परिणामाने त्या मुलीला लगेच नकार कळवतात . का भितात सगळे जण या मंगळाला ? केवळ तांबूस दिसणारा हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील एक ग्रहच आहे मग याची इतकी भीती का? खरे पाहता याचे ज्योतिष शास्त्रीय विश्लेषण केलेतर मग बऱ्याच जणाच्या मनातील गोंधळ दूर होईल.लोकं उगाचच मंगळाची मुलगी किंवा मुलगा बाकी सर्व दृष्टीने चांगला असून केवळ मंगळ आहे म्हणुन नाकारणार नाहीत हे नक्की .
तसे पाहीले तर कुंडलीमध्ये १२ स्थाने असतात त्यापैकी १ ,४ , ७ ,८ ,१२ या ठिकाणी मंगळ असेल तर त्या कुंडलीस मंगळाची कुंडली म्हणतात . आता ही स्थाने वगेरे समजणे जरा कठीण आहे .परंतु तरीही या प्रत्येक ठिकाणी मंगळ असण्याचा परिणाम पाहिला तर मग लक्षात येईल . १ या स्थानात जेव्हां मंगळ असतो तेव्हा व्यक्ती जरा तापट स्वभावाची असते .वागण्यात थोडी घाई असते .पण तरीही एक धैर्यवान व्यक्ती म्हणुन ही व्यक्ती संकट काळी डगमगत नाही .....मग अशी धैर्यवान व्यक्ती जोडीदार असायला काय हरकत आहे ?
४ त्या स्थानी मंगळ असतो तेव्हा मंगळाच्या दृष्टी सप्तमावर पडते .त्यामुळे कधी कधी नवरा बायकोत वाद विवाद होतात ,आणि ते जरा उग्र रूप धरण करू शकतात . पण ४ त्या स्थानातला मंगळ व्यक्तीला मोठी जमीन जुमला ,घरे मिळवून देतो ,जे भल्या भल्यांना नशिबात नसते . ...,अग असा छान घर ,जमीन असणारा जोडीदार का नको........?
७ व्या स्थानात मंगळ असतो तेव्हा देखील जोडीदार तापट असतो . आणि मंगळाच्या दृष्टीमुळे ही व्यक्ती ही वाद विवाद घालू लागते .तसेच काहीशी खर्चिक पण असते ...पण अशा व्यक्ती उत्तम व्यावसायिक ठरु शकतात . तसेच स्वतः जोडीदाराशी किती भांडोत पण आपल्या जोडीदाराकडे इतरांनी वाकडा डोळा करून पाहीले तर त्यांना सहन होत नाही . पण असा जोशपूर्ण जोडीदार का नको ...?
८ व्या स्थानात मंगळ असताना व्यक्तीला उष्णतेचे विकार होतात .पण या लोकांना वारसा हक्काने धन मिळणे ,किंवा गुप्त धन ,विना श्रमाचे धन सहज गत्या मिळते . ...
१२ व्या स्थानात मंगळ असेल तर लढवय्ये व्यक्तिमत्व असते ,सैन्य पोलीस खात्यात नोकरी असते ,पैसा जरा जास्त खर्च होतो .पण तो आला तरच खरच होणार म्हणूनच पैशाचा उपभोग घेण्याची वृत्ती असते . मग काय हरकत आहे इथे मंगळ असला तरी ....
तर माझे सांगणे आहे की केवळ एकटा मंगळ पूर्ण पत्रिकेवर प्रभाव टाकू शकत नाही .बाकीचे ८ ग्रह देखील त्याच्याहून जास्त प्रभाव टाकत असतात .तर मग नवरा बायकोचे एकमेकांशी पटणे, हे केवळ मंगळ असणे या गोष्टीवर अजिबात अवलंबून नाही . म्हणुन केवळ मंगळ आहे म्हणुन पत्रिका नाकारू नका . निष्णात आणि तरीही सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवणाऱ्या ज्योतीषासच कुंडली दाखवा आणि त्यांच्या सल्ल्याने मग एखादी पत्रिका कशी आहे याचा अंदाज घ्या .केवळ अर्धवट माहितीच्या आधारे स्वतःच्या किंवा इतरांच्या आयुष्याशी खेळू नका.
संपर्क : 9890447025