Margashirsha Guruvar 2022: योगेश्वरी मातेचे नवरात्र सुरू आहे, त्यात आज महालक्ष्मीचे पूजन; त्यानिमित्ताने म्हणा 'हे' प्रभावी मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 07:28 AM2022-12-01T07:28:09+5:302022-12-01T07:28:29+5:30

Margashirsha Guruvar 2022: सप्तशतीतले मंत्र प्रभावी आहेतच शिवाय दुःख, संकट, नैराश्य यातून मार्ग दाखवणारेही आहेत. 

Margashirsha Guruvar 2022: Navratri of Yogeshwari Mata Navratra started, worshiping Mahalakshmi today; On that occasion, say 'this' effective mantra! | Margashirsha Guruvar 2022: योगेश्वरी मातेचे नवरात्र सुरू आहे, त्यात आज महालक्ष्मीचे पूजन; त्यानिमित्ताने म्हणा 'हे' प्रभावी मंत्र!

Margashirsha Guruvar 2022: योगेश्वरी मातेचे नवरात्र सुरू आहे, त्यात आज महालक्ष्मीचे पूजन; त्यानिमित्ताने म्हणा 'हे' प्रभावी मंत्र!

googlenewsNext

सप्तशतीतील प्रत्येक मंत्रच विलक्षण प्रभावी आहे. योग्य पद्धतीने त्याचा जप केल्यास चांगली फलप्राप्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. त्या सातशे श्लोकांपैकी काही श्लोकांचा, मंत्रांचा विशेष कार्यासाठी उपयोग केला जातो. गीताप्रेस गोरखपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथातून साभार!
प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे-

संकट नाशासाठी-
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे
सर्वस्यार्तिहरे देवी नारायणी नमोऽस्तुते।

भयनाशासाठी-
सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तीसमन्विते,
भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते।

रोगनाशासाठी-
रोगानशेषानपहंसि तुष्टा, रुष्टा तु काान् सकलानभीष्ठान् 
त्वामाश्रितानां न विपन्नराणां, त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति।

आरोग्य व सौभाग्य प्राप्तीसाठी-
देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्
रूपम् देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।

उत्तम पत्नीच्या प्राप्तीसाठी-
पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्
तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्

उत्तम पतीच्या प्राप्तीसाठी-
पतिं मनोरमं देहि मनोवृत्तानुसारिणम्
तारिणं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्

बाधा शांतीसाठी-
सर्वबादाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि,
एकमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम्

दारिद्रय व दु:ख नाशासाठी-
दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो, स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि,
दारिद्रयदु:खभयहारिणी का त्वदन्या, सर्वेपकारकरणाय सदाऽऽद्र्रचित्ता।

सर्व प्रकारच्या कल्याणासाठी-
सर्वमंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽऽस्तुते।

बाधा मुक्ती व धनपुत्रादिसाठी-
सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वित:
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:।

अशा प्रकारे अखिल मानव जातील केवळ वरदान असलेल्या या ग्रंथात अनेक प्रभावी मंत्र आहेत. हे मंत्र नुसते जपले तरी त्यांचा अनुभव येतो. तथापि, यांचा पल्लव किंवा संपुटासारका उपयोग केल्यास लवकर फलप्राप्ती होते. 

Web Title: Margashirsha Guruvar 2022: Navratri of Yogeshwari Mata Navratra started, worshiping Mahalakshmi today; On that occasion, say 'this' effective mantra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.