Margashirsha Guruvar 2024: महालक्ष्मी व्रताचे उद्यापन यंदा ४ की ११ जानेवारीला? गोंधळू नका, सविस्तर माहिती वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 10:53 AM2024-01-03T10:53:24+5:302024-01-03T10:54:06+5:30
Margashirsha Guruvar 2024: मार्गशीर्षातील महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचे याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे, तो दूर करण्यासाठी सविस्तर माहिती वाचा!
४ जानेवारी रोजी मार्गशीर्षातील गुरुवार आणि ११ जानेवारी रोजी मार्गशीर्ष अमावस्या गुरुवारी आल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचे असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती. मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली. त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे.
११ जानेवारी रोजी मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारचा सूर्योदय पाहणार आहे. अमावस्या आणि लक्ष्मी पूजन हा योग दिवाळीतही आपण साजरा करतो, त्यामुळे अमावस्येचा अडसर या व्रताला होणार नाही. उलट १ गुरुवार अधिक मिळणार आहे, त्यामुळे उपासनेतही वाढ होईल. म्हणून इतर कोणतीही साशंकता न बाळगता ११ जानेवारी रोजी उद्यापन करा, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार या व्रताचा पूजा कालावधी सूर्योदयापासूनच सुरु होतो. पूजा,कहाणी,आरती हे विधी सकाळीच केले जातात.दिवसभर उपास करून सायंकाळी नैवेद्य,आरती सुद्धा लवकर केली जाते. त्यानुसार उद्यापनाच्या दिवशी सर्व पूजा करून सायंकाळी देवीची आरती झाल्यावर तिला दूध, साखर, पोह्यांचा नैवेद्य दाखवावा. झालेल्या पूजेत काही उणीव राहिली असल्यास किंवा काही चुका झाल्या असल्यास क्षमा मागावी आणि केलेली सेवा गोड मानून घे अशी देवीला प्रार्थना करावी. पुनरागमनायच अर्थात देवी आमच्यावर कृपादृष्टी ठेवून परत पुढच्या वर्षी ये असं सांगून कलश जागेवरून हलवून घ्यायचा आणि शिस्तबद्धपणे पूजा आवरून घ्यायची आणि देवीला निरोप द्यायचा.
देवीला निरोप देताना अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणावे, त्यामुळे घरात भरभराट होते. स्तोत्र पुढीलप्रमाणे -
श्री अष्टलक्ष्मी स्त्रोतम:
आदि लक्ष्मी
सुमनस वन्दित सुन्दरि माधवि चंद्र सहोदरि हेममये ।
मुनिगण वन्दित मोक्षप्रदायिनी मंजुल भाषिणि वेदनुते ।
पङ्कजवासिनि देवसुपूजित सद-गुण वर्षिणि शान्तिनुते ।
जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि परिपालय माम् ।
धान्य लक्ष्मी:
अयिकलि कल्मष नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।
क्षीर समुद्भव मङ्गल रुपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।
मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रित पादयुते ।
जय जय हे मधुसूदनकामिनि धान्यलक्ष्मि परिपालय माम् ।
धैर्य लक्ष्मी:
जयवरवर्षिणि वैष्णवि भार्गवि मन्त्र स्वरुपिणि मन्त्रमये ।
सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनि शास्त्रनुते ।
भवभयहारिणि पापविमोचनि साधु जनाश्रित पादयुते ।
जय जय हे मधुसूदन कामिनि धैर्यलक्ष्मि सदापालय माम् ।
गज लक्ष्मी:
जय जय दुर्गति नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।
रधगज तुरगपदाति समावृत परिजन मंडित लोकनुते ।
हरिहर ब्रम्ह सुपूजित सेवित ताप निवारिणि पादयुते ।
जय जय हे मधुसूदन कामिनि गजलक्ष्मि रूपेण पालय माम् ।
सन्तान लक्ष्मी:
अयि खगवाहिनी मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये ।
गुणगणवारिधि लोकहितैषिणि सप्तस्वर भूषित गाननुते ।
सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वन्दित पादयुते ।
जय जय हे मधुसूदन कामिनि सन्तानलक्ष्मि परिपालय माम् ।
विजय लक्ष्मी:
जय कमलासनि सद-गति दायिनि ज्ञानविकासिनि गानमये ।
अनुदिन मर्चित कुङ्कुम धूसर भूषित वसित वाद्यनुते ।
कनकधरास्तुति वैभव वन्दित शङ्करदेशिक मान्यपदे ।
जय जय हे मधुसूदन कामिनि विजयक्ष्मि परिपालय माम् ।
विद्या लक्ष्मी:
प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि शोकविनाशिनि रत्नमये ।
मणिमय भूषित कर्णविभूषण शान्ति समावृत हास्यमुखे ।
नवनिद्धिदायिनी कलिमलहारिणि कामित फलप्रद हस्तयुते ।
जय जय हे मधुसूदन कामिनि विद्यालक्ष्मि सदा पालय माम् ।
धन लक्ष्मी:
धिमिधिमि धिन्धिमि धिन्धिमि-दिन्धिमी दुन्धुभि नाद सुपूर्णमये ।
घुमघुम घुङ्घुम घुङ्घुम घुङ्घुम शङ्ख निनाद सुवाद्यनुते ।
वेद पुराणेतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते ।
जय जय हे कामिनि धनलक्ष्मी रूपेण पालय माम् ।
अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।
विष्णुवक्षःस्थलारूढे भक्तमोक्षप्रदायिनी ।।
शङ्ख चक्र गदाहस्ते विश्वरूपिणिते जयः ।
जगन्मात्रे च मोहिन्यै मङ्गलम शुभ मङ्गलम ।
। इति श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम सम्पूर्णम ।