Margashirsha Purnima 2022: मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्यंत शुभ योग; ‘असे’ करा लक्ष्मी पूजन, मिळेल अपार पैसा अन् लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 03:01 PM2022-12-07T15:01:12+5:302022-12-07T15:03:21+5:30

Margashirsha Purnima 2022: मराठी वर्षातील सर्वोत्तम आणि श्रेष्ठ अशा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला करण्यात येणारे लक्ष्मी पूजन विशेष आणि शुभ फलदायी मानले जाते. जाणून घ्या...

margashirsha purnima 2022 know lakshmi devi puja vidhi amazing auspicious yoga and importance of margashirsha purnima | Margashirsha Purnima 2022: मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्यंत शुभ योग; ‘असे’ करा लक्ष्मी पूजन, मिळेल अपार पैसा अन् लाभच लाभ!

Margashirsha Purnima 2022: मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्यंत शुभ योग; ‘असे’ करा लक्ष्मी पूजन, मिळेल अपार पैसा अन् लाभच लाभ!

googlenewsNext

Margashirsha Purnima 2022: मराठी वर्षातील महत्त्वाचा आणि विशेष मानला गेलेला मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या महिन्यात येणारी पौर्णिमा अतिशय शुभ मानली जातो. मार्गशीर्ष पौर्णिमा एखाद्या सणासारखी साजरी केली जातो, असे म्हटले जाते. मार्गशीर्ष  महिना हा सर्व महिन्यांमध्ये सर्वांत पवित्र आणि श्रेष्ठ मानला जातो. म्हणून या महिन्याच्या पौर्णिमेला वेगळे महत्त्व आहे. सन २०२२ मध्ये ७ डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू होत असून, ८ डिसेंबर रोजी पौर्णिमा समाप्ती आहे. पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, ध्यानधारणा करणे, दान करणे आणि पितरांना तर्पण देणे अत्यंत शुभ मानले जाते. या मार्गशीर्ष पौर्णिमेला अनेकविध शुभ योग जुळून आले आहेत. यासोबतच या दिवशी त्रिपुरा सुंदरी जयंती आणि श्रीदत्त जयंती (Datta Jayanti 2022) साजरी केली जाते. (importance of margashirsha purnima)

मार्गशीर्ष महिन्याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे की, 'मासानां मार्गशीर्षोहम्' म्हणजे सर्व महिन्यांतील मार्गशीर्ष मीच आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या महिन्याच्या पहिल्या तिथीपासून देवतांचे वर्ष सुरू होते. नद्यांमध्ये स्नान, जप, तपश्चर्या, दान आणि पितरांना तर्पण दिल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. मार्गशीर्ण पौर्णिमेच्या दिवशी श्रीविष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते, असे म्हटले जाते. (amazing auspicious yoga on margashirsha purnima)

मार्गशीर्ष पौर्णिमेला जुळून आलेत अत्यंत शुभ योग

मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवी यांसह महादेव शिवशंकर आणि चंद्रदेव यांचेही पूजन केल्यास शुभ फळ मिळते, असे म्हटले जाते. यामुळे ग्रह आणि नक्षत्रही अनुकूल राहतात. कुंडलीत चंद्राची स्थितीही मजबूत होऊ शकते. मार्गशीर्ष पौर्णिमेला सिद्ध योग, अमृत काल, रवियोग असे शुभ योग जुळून आले आहेत. यासह सर्वार्थ सिद्धी योगही दिवसभर असेल. त्यामुळे या तिथीचे महत्त्व अधिकच वाढल्याचे सांगितले जात आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेचे वर्णन शास्त्र आणि पुराणातही सर्वात फलदायी मानले गेले आहे. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान आणि दान केल्याने बत्तीस पट पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. (lakshmi devi puja vidhi on margashirsha purnima)

‘असे’ करा लक्ष्मी देवीचे पूजन

मार्गशीर्ष पौर्णिमेला तिन्हीसांजेला करण्यात येणारे लक्ष्मी पूजन विशेष आणि शुभ असल्याचे सांगितले जाते. सायंकाळी व्रताचा संकल्प करून लक्ष्मी देवीचे आणि श्रीविष्णूंचे पूजन करावे. अक्षता, हळद-कुंकू, तुलसीपत्र, फुले-फळे अर्पण करून लक्ष्मी देवीच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. मनोभावे स्मरण करावे. आरती करावी आणि लक्ष्मी देवीचे नामस्मरण करावे. आरतीनंतर शक्य असल्यास विष्णु सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रत अत्यंत भक्तिभावाने करावे. यथाशक्ती दानधर्म करावा. पौर्णिमेला चंद्र दर्शन करावे आणि शक्य असल्यास अर्घ्य द्यावे. या दिवशी दत्त जयंतीही साजरी केली जात असल्याने दत्तगुरुंचे पूजन, नामस्मरण करावे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: margashirsha purnima 2022 know lakshmi devi puja vidhi amazing auspicious yoga and importance of margashirsha purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.