Sankashti Chaturthi December 2022: मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी: ‘अशी’ करा गणपती बाप्पाची पूजा; महत्त्व आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 02:26 PM2022-12-10T14:26:33+5:302022-12-10T14:40:54+5:30
Sankashti Chaturthi December 2022: सर्वांत शुभ मानल्या गेलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे करावे? जाणून घ्या, विविध शहरांतील चंद्रोदय वेळा...
Margashirsha Sankashti Chaturthi December 2022: मराठी वर्षातील सर्वांत पवित्र आणि शुभ मानला गेलेला मार्गशीर्ष महिना सुरु आहे. या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी रविवार, ११ डिसेंबर रोजी आहे. हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी बाप्पाला प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. डिसेंबर महिन्यातील मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि बाप्पाच्या पूजेची सोपी पद्धत जाणून घ्या... (Margashirsha Sankashti Chaturthi December 2022 Date)
प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो. कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय असतात. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर एकवेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा.
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी: रविवार, ११ डिसेंबर २०२२
मार्गशीर्ष वद्य चतुर्थी प्रारंभ: रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०४ वाजून १४ मिनिटे.
मार्गशीर्ष वद्य चतुर्थी समाप्ती: सोमवार, १२ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०६ वाजून ४८ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी करावे, असे सांगितले जाते. (Margashirsha Sankashti Chaturthi December 2022 Vrat Puja Vidhi In Marathi)
गणपती बाप्पाच्या पूजनाची सोपी पद्धत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Margashirsha Sankashti Chaturthi December 2022 Chandrodaya Timing)
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे |
बीड | रात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०८ वाजून ४१ मिनिटे |
औरंगाबाद | रात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०८ वाजता ४५ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे |
उस्मानाबाद | रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०८ वाजून २९ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०८ वाजून २१ मिनिटे |
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"