आज कार्तिक दर्श अमावस्या, 'या' ५ चूका टाळा; नाहीतर नकारात्मक घटनांना जवळ कराल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 10:15 AM2022-11-23T10:15:40+5:302022-11-23T10:39:49+5:30
कार्तिक दर्श अमावस्येला चुकूनही पुढील कोणतीही चूका करु नका.
आज नोव्हेंबर महिन्यातील कार्तिक दर्श अमावस्या आहे. या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान करण्याची परंपरा आहे. अमावस्येच्या रात्री भूत, पित्र, पिशाच्च आणि निशाच्च यांसारख्या नकारात्मक शक्ती खूप सक्रिय असतात असे म्हणतात. म्हणूनच अमावस्येला चुकूनही पुढील कोणतीही चूका करु नका.
कार्तिक दर्श अमावस्या २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६.५३ वाजता सुरू होईल आणि गुरुवार, २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ०४.२६ वाजता समाप्त होईल. दर्श अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पिंपळाची पूजा केल्यास विशेष फळ मिळते. सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या झाडाच्या मुळास जास्त पाणी अर्पण करावे. पूजेनंतर ११ परिक्रमा करा. असे केल्याने कुटुंबात सुख-शांती नांदते.
स्मशानभूमीपासून दूर राहा- अमावस्येच्या रात्री चुकूनही स्मशानभूमी किंवा तिच्या जवळ जाऊ नये. तसेच अमावस्येच्या रात्री वर्दळ नसलेल्या रस्त्यावर जाणे टाळावे. असे म्हटले जाते की, अमावस्येच्या दिवशी कमकुवत हृदयाचे लोक सहजपणे नकारात्मक शक्तींच्या प्रभावाखाली येतात, त्यामुळे अशा लोकांनी सावध राहावे.
उशिरापर्यंत झोपू नका - अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणे टाळावे. असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळू शकत नाही. या दिवशी सूर्योदयानंतर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
भांडण आणि शिवीगाळ- अमावस्येच्या दिवशी घरातील भांडणे टाळावीत. अमावस्येला ज्या घरात मारामारी आणि भांडणे होतात, त्या घरात पित्रांचा आशीर्वाद राहत नाही असे म्हणतात. म्हणूनच या दिवशी घरात शांततेचे वातावरण राखण्याचा प्रयत्न करा. अमावस्येला रागावू नका आणि कोणाला शिवीगाळ करू नका.
तामसी आहार- दर्श अमावस्येला तामसी म्हणजेच तिखट पदार्थांचे सेवन करू नका. या दिवशी जेवणात लसूण आणि कांदा वापरू नये. या दिवशी मांस, मासे आणि अल्कोहोलपासून दूर राहावे.
शारीरिक संबंध- अमावस्येच्या दिवशी पती-पत्नीनेही शारीरिक संबंध करणे टाळावे. असे म्हटले जाते की, अमावस्या आणि प्रतिपदा या तिथी असणाऱ्या दिवशी आपले शरीर आणि मन दोन्हीपासून पूर्णपणे शुद्ध राहिले पाहिजे.