Mohini Ekadashi 2024: मोहिनी एकादशीला शुक्राचे स्थलांतर होणार आणि 'या' तीन राशींचे भाग्य पालटणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 04:24 PM2024-05-14T16:24:05+5:302024-05-14T16:24:31+5:30
Mohini Ekadashi 2024: मोहिनी एकादशीला विष्णु उपासना केली असता लक्ष्मी प्राप्तीदेखील होते, त्यात विशेष लाभ होणार आहे दिलेल्या तीन राशींना!
हिंदू कॅलेंडरनुसार, मोहिनी एकादशीचे व्रत दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते. हिंदू धर्मात एकादशी तिथी भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. अशा परिस्थितीत वैशाख महिन्याच्या या एकादशीला विशेष उपाय केले असताजीवनात विशेष लाभ मिळू शकतो.
सनातन धर्मात एकादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने साधकाला भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. मोहिनी एकादशीच्या दिवशी शुक्र मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, ज्याचे फायदे अनेक राशींना त्यांच्या आयुष्यात पाहायला मिळतील. तरी विशेष लाभार्थी असतील पुढील तीन राशि!
शुभ मुहूर्त : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी १८ मे रोजी सकाळी ९.५२ वाजता सुरू होत आहे. तसेच, ही तारीख १९ मे रोजी दुपारी १२.२० वाजता संपेल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचे व्रत रविवार, १९ मे रोजी वैध असेल.
मेष : मेष राशीच्या लोकांना मोहिनी एकादशीला धन मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांनाही फायदा होणार आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मोहिनी एकादशी शुभ असणार आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांना प्रगती दिसेल. कुटुंबात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नोकरीतही प्रगतीची शक्यता आहे.
सिंह : मोहिनी एकादशीला होत असलेल्या ग्रहसंक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांना जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. नोकरदारांना अनेक नवीन संधी मिळतील. कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. त्याचबरोबर वैवाहिक जीवनातही प्रेम कायम राहील.