पैशांची भरभराट व्हावी असे वाटत असेल तर मनी प्लांट नक्की लावा, पण लावताना 'या' चूका टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 08:37 PM2022-08-09T20:37:15+5:302022-08-09T20:52:31+5:30

घराची शोभा वाढवण्यासाठी लोक मनी प्लांट्स वापरतात. मनी प्लांट आपल्याला प्रदूषणापासून तर वाचवतोच पण ऑक्सिजनही चांगला देतो.

money plant vastu shastra tips | पैशांची भरभराट व्हावी असे वाटत असेल तर मनी प्लांट नक्की लावा, पण लावताना 'या' चूका टाळा

पैशांची भरभराट व्हावी असे वाटत असेल तर मनी प्लांट नक्की लावा, पण लावताना 'या' चूका टाळा

googlenewsNext

आजच्या काळात तुम्हाला जवळपास प्रत्येक भारतीय घरात मनी प्लांट लावलेला दिसेल. काही लोकांना मनी प्लांट घरात ठेवायला आवडते तर काहींना बाहेर बागेत किंवा बाल्कनीत लावायला आवडते. घराची शोभा वाढवण्यासाठी लोक मनी प्लांट्स वापरतात. मनी प्लांट आपल्याला प्रदूषणापासून तर वाचवतोच पण ऑक्सिजनही चांगला देतो.

वास्तुशास्त्रात मनी प्लांटचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक स्थिती लगेच सुधारते. अनेकदा लोक आपल्या घरात कोणत्याही ठिकाणी मनी प्लांट ठेवतात पण ते करू नये. वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावण्यासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे योग्य पालन केल्यास तुम्हाला फायदा होईल मात्र मनी प्लांट लावताना तुम्ही काही चुका केल्या तर त्यामुळे तुमच्यावर मोठे आर्थिक संकटही येऊ शकते.

- मनी प्लांटला वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज नसते, ते घराच्या आताही व्यवस्थित वाढते. त्यामुळे मनी प्लांट कायम घराच्या आताच ठेवावे. ते घराबाहेर लावू नये.

- वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या अग्निमय दिशेला लावावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मकता दूर होते. आग्नेय दिशेला मनी प्लांट लावल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

- वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर-पूर्व दिशेला मनी प्लांट कधीही ठेवू नये. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते. मनी प्लांट दक्षिण पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते.

- घरामध्ये मनी प्लांट लावताना हे लक्षात ठेवा की मनी प्लांटची वेल जमिनीला स्पर्श करू नये किंवा मनी प्लांट कधीच लटकत्या अवस्थेत ठेऊ नये. कारण हे अशुभ मानले जाते. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. घरातील सदस्यही आजारी पडू शकतात. तसेच घरातील सुख-समृद्धीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

- तुम्ही मनी प्लांटला दोरी किंवा काठीच्या मदतीने वरच्या बाजूला बांधू शकता. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचे नशीबही पालटेल. मनी प्लांटला पाणी देताना पाण्यात थोडे दूध मिसळा. त्यामुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही. रविवारी मनी प्लांटला पाणी देऊ नका.

Web Title: money plant vastu shastra tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.