८१० हुन अधिक साधकांनी नागपुरात केले श्रीदत्तलीलामृताब्धिसार ग्रंथाचे सामूहिक पारायण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:40 PM2023-01-24T12:40:23+5:302023-01-24T12:42:06+5:30

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत भगवान श्री दत्तात्रेयांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे, त्याच्या सामूहिक पठणाचा आनंद सोहळा!

More than 810 Sadhaks performed collective recitation of Sridattalilamritabdhisar Granth in Nagpur! | ८१० हुन अधिक साधकांनी नागपुरात केले श्रीदत्तलीलामृताब्धिसार ग्रंथाचे सामूहिक पारायण!

८१० हुन अधिक साधकांनी नागपुरात केले श्रीदत्तलीलामृताब्धिसार ग्रंथाचे सामूहिक पारायण!

Next

श्री वासुदेव आश्रम (अभ्यासिका), वाशीम आणि नागपूर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी रोजी रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात एक अनोखा संपन्न झाला. तो सोहळा होता सामूहिक ग्रंथ पठणाचा. ब्रह्मीभूत प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज रचित श्रीदत्तलीलामृताब्धिसार या ग्रंथाचे सामूहिक ८१० पाठ उत्सव (पारायण) पठण करण्यात आले. 

शांतीसागर करुणाधन प. पू. समर्थ सद्गुरु माऊली श्री पंडितकाका धनागरे महाराज यांचे सहस्त्र चंद्र दर्शन अर्थात ८१ वे वर्ष साजरे करणार आहोत. या अंतर्गत संपन्न होणाऱ्या विविध उपक्रमा अंतर्गत समर्थ सद्गुरु माऊली धर्मभूषण श्री दत्तसंप्रदायवर्धक प.पू. श्री विजयकाका पोफळी महाराज यांनी श्रीक्षेत्र काशी येथे सर्व भक्तगणांतर्फे सामूहिक ग्रंथ पठणाचा संकल्प केला होता. त्या संकल्प पूर्तीसाठी ब्रह्मीभूत प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज रचित श्रीदत्तलीलामृताब्धिसार ग्रंथाचे सोळा हजार पाठ करण्याचा संकल्प सर्व भक्तगणांतर्फे केलेला आहे. या अंतर्गत आज अत्यंत देखणा आणि सुंदर असा कार्यक्रम नागपूरकरांनी अनुभवला.

प. पू.सद्गुरु माऊली श्रीविजयकाका पोफळी महाराज पूर्णवेळ या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सगळे वातावरण मंगलमय झाले होते. पुरुष साधक, महिला भगिनी संपूर्ण कार्यक्रमात मंगलवेशात उपस्थित होते. अत्यंत देखणा रंगमंच,रेणुका देशकर यांचे सूत्र संचलन आणि नागपुरातील युवा दिलरुबा वादक ऋषिकेश करमरकर याच्या एकल वादनाने वातावरण चैतन्यमय झाले होते. ८१० हुन अधिक साधकांनी काकांनी सांगितलेल्या संकल्पानंतर पोथीचे पारायण सुरू केले. 

प.पू.विजय काकांनी साधकांना मार्गदर्शन करतांना आपल्या उद्बोधनात सांगितले, की श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत भगवान श्री दत्तात्रेयांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे. प.पू. श्री पंडित काकांनी तब्बल बारा वर्षं याचे नियमित पारायण केले होते. प्रवासात असतांना सुद्धा ते याचे पारायण करत असत. प.पू.विजय काकांची भावपूजा, आरती आणि प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: More than 810 Sadhaks performed collective recitation of Sridattalilamritabdhisar Granth in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.