Mrityu Panchak Yog 2023: १३ मे रोजी मृत्यू पंचक लागणार आहे, दरम्यान काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 07:00 AM2023-05-13T07:00:00+5:302023-05-13T07:00:01+5:30
Mrityu Panchak Yog 2023: ज्योतिषशास्त्रात पंचक काळ अशुभ मानला जातो.अशा परिस्थितीत या काळात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया.
पंचक हे वैदिक ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानले जाते. हे पाच दिवसांसाठी असते. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार एकूण २७ नक्षत्रे आहेत. यापैकी शेवटची पाच नक्षत्रे म्हणजे धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपद आणि रेवती. या नक्षत्रांच्या संयोगाला पंचक म्हणतात. यासोबतच चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा पंचक होते.
यंदा मृत्यू पंचक मे महिन्यात होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनिवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना मृत्यु पंचक म्हणतात. मृत्युपंचकातील पाच दिवसांत कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबावर, गावावर संकटांचा डोंगर कोसळतो, असे म्हणतात. म्हणजेच हा काळ मृत्यूसारखा भीतीदायक असतो.
मृत्यू पंचक वेळ: मृत्यू पंचक १३ मे २०२३ रोजी दुपारी १२. १८ मिनिटांनी सुरू होईल आणि १७ मे रोजी सकाळी ७. ३७ वाजता समाप्त होईल.
मृत्युपंचकादरम्यान छप्पर घालणे, नवीन खरेदी करणे, प्रवास सहलीसाठी, तीर्थयात्रेला निघणे अशी कामे करू नयेत. यासोबतच दक्षिण दिशेला प्रवास करणेही टाळावे. असे केल्याने अपघाताचा धोका संभवतो. या काळात कोणाचा मृत्यू झाल्यास, पंचक शांती केल्यानंतरच मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार केले जातात.
पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांनी विशेष शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करावेत. तसे केल्यामुळे अशुभ परिणामांसह कुटुंबातील किंवा गावातील इतर मृत्यू टाळता येतात. म्हणून आजही कोणाचा मृत्यू झाल्यास पंचक नाही ना हे ज्योतिषांकडून विचारून घेतले जाते.