शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी १० सोपे उपाय अवश्य करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 12:36 PM2021-03-12T12:36:48+5:302021-03-12T12:37:06+5:30
शनी देव उग्र, तपस्वी आणि कठोर स्वभावाचे असले, तरीही ते मनोभावे केलेल्या भक्तीवर निश्चित प्रसन्न होतात.
शनि महाराजांची कृपादृष्टी लाभावी असे आपल्या सर्वांनाच वाटते. परंतु, कळत नकळत आपल्या हातून काही चुका घडतात, त्यामुळे आपण त्यांची नाराजी ओढावून घेतो. म्हणून त्यांच्या पूजेइतकेच महत्त्वाचे आहे आपल्या जीवनशैलीत बदल. ते बदल कोणते ते पाहुया...
- शनिवारी तेल मालिश करून अंघोळ केली पाहिजे.
- शनि महाराज सेवेने तृप्त होतात. गरिबांची सेवा केली असता त्यांचा कृपाशिर्वाद लाभतो.
- गरजू व्यक्तीला दान किंवा आजारी व्यक्तीची सुश्रुषा केली असता, शनि महाराज प्रसन्न होतात.
- शनि देवांना उडदाचे लाडू आवडतात. उडदाच्या लाडवाचा नैवेद्य त्यांना दाखवावा, त्याचबरोबर ते लाडू गरीबाला दान केले असता, ते शनि देवांना अर्पण केल्यासारखे असतात.
- ज्या घरात वृद्ध माता पित्यांची सेवा केली जाते, त्या घरावर शनि देवांची कृपादृष्टी असते. आणि जिथे वृद्धांचा अपमान केला जातो, तिथे शनि देवांची अवकृपा होते.
- शनि मंदिरात कामी येईल, अशी कोणतीही वस्तू दान करावी. ती वस्तू लोखंडी असेल तर उत्तम!
- शनि मंदिरातून शनि रक्षा कवच किंवा काळा धागा शनि देवांच्या पायी लावून भक्तीभावे मनगटावर बांधावा.
- शनि देव हनुमंताला आणि भोलेनाथाला खूप मानतात. शनि देवांची वक्रदृष्टी टाळण्यासाठी हनुमंताची आणि शिवशंकराची उपासना करावी. शनि चालीसा, शिव चालीसा, बजरंगबाण, हनुमान चालीसा इ. स्तोत्रांचे पठण करावे.
- शनि कथांचे पठण करावे.
- शनि मंदिरात जाऊन `ऊँ शनैश्चराय नम:' हा मंत्र जप करावा.