‘नाद गणेश’ची मैफल रविवारी; गणेशभक्तांसाठी सुमधुर ऑनलाइन भक्तिसंगीताचा आविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 03:56 AM2020-08-28T03:56:22+5:302020-08-28T03:56:42+5:30

कॅलिक्स गु्रप ऑफ कंपनीज व काका हलवाई स्वीट सेंटर यांच्या सहयोगाने हा ‘नाद गणेश’ कार्यक्रम होत आहे. ‘

‘Nad Ganesh’ concert on Sunday; Invention of melodious online devotional music for Ganesha devotees | ‘नाद गणेश’ची मैफल रविवारी; गणेशभक्तांसाठी सुमधुर ऑनलाइन भक्तिसंगीताचा आविष्कार

‘नाद गणेश’ची मैफल रविवारी; गणेशभक्तांसाठी सुमधुर ऑनलाइन भक्तिसंगीताचा आविष्कार

googlenewsNext

पुणे : चौसष्ठ कलांचा अधिपती म्हणजे बुद्धधीचा देवता ‘श्रीगणेश’’.दरवर्षी गणेशोत्सव काळात विविध कलांच्या सादरीकरणातून गणरायाला वंदन केले जाते. यंदाच्या उत्सवात कोरोनाने ‘विघ्न’ घातले असले तरी ऑनलाइन स्वरूपात गणेशाच्या चरणी संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांकडून कलासेवा अर्पित केली जाणार आहे. ‘लोकमत’तर्फे रविवारी ( ३० ऑगस्ट) नाद गणेश कार्यक्रमाद्वारे सुरांची मनसोक्त उधळण रसिकमनावर होणार आहे. द रोझरी फौंडेशनच्या सहयोगाने ही मैफल रंगणार आहे.

कॅलिक्स गु्रप ऑफ कंपनीज व काका हलवाई स्वीट सेंटर यांच्या सहयोगाने हा ‘नाद गणेश’ कार्यक्रम होत आहे. ‘नाद गणेश’ या मैफलीत प्रसिद्ध युवा गायक राहुल देशपांडे, गायिका आर्या आंबेकर यांच्या अद्वितीय सुरांची अनुभूती रसिकांना मिळणार आहे. त्यांना अनय गाडगीळ (सिंथेसायझर) यांची साथसंगत लाभली आहे.

दरवर्षी ’ती चा गणपती’ उत्सवात ’नाद गणेश’ कार्यक्रमाद्वारे संगीताची अनोखी मेजवानी रसिकांना मिळते. यंदा उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ ‘याचि देही याचि डोळा’ रसिकांना घेता येणार नसला तरी हा कार्यक्रम घरबसल्या अनुभवण्याची संधी रसिकांना देण्यात आली आहे.

नाद गणेश कार्यक्रम
रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी ५.३० वाजता www.facebook/lokmat/, www.youtube.com/LokmatBhakti  या लिंकवर या भक्ती मैफिलीचा आस्वाद रसिकांना घेता येईल.

Web Title: ‘Nad Ganesh’ concert on Sunday; Invention of melodious online devotional music for Ganesha devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.