Nag Panchami 2022: कालसर्प दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीला करा 'हे' प्रभावी उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 01:05 PM2022-07-20T13:05:22+5:302022-07-20T13:06:57+5:30

Nag Panchami 2022: नागपंचमीला आपण सापाची, नागांची पूजा करतोच, त्याबरोबर कुंडलीतील कालसर्प दोषापासून पुढील उपाय करा. 

Nag Panchami 2022: Do 'These' Effective Remedies On Naag Panchami To Get Rid Of Kalsarp Dosha! | Nag Panchami 2022: कालसर्प दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीला करा 'हे' प्रभावी उपाय!

Nag Panchami 2022: कालसर्प दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीला करा 'हे' प्रभावी उपाय!

googlenewsNext

नागपंचमी (Nag Panchami 2022)हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे. यावर्षी २ ऑगस्ट २०२२ रोजी नामपंचमी मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी भगवान शिवासोबतच माता पार्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ योग जुळून येत आहे. तसेच या दिवशी कालसर्प दोष दूर करण्याचीही संधी असते. कशी ते जाणून घेऊ. 

शास्त्रानुसार या दिवशी नागांची पूजा केल्याने व्यक्तीला कालसर्प दोषापासून (Kal Sarpa Dosha) मुक्ती मिळते. तसेच आध्यात्मिक शक्ती, संपत्ती प्राप्त होऊन अन्य इच्छा पूर्ण होतात. या दिवशी काही विशेष उपाय देखील फायदेशीर ठरतात. 
नागपंचमीला हे उपाय करा

>>असे मानले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प योग आहे, त्यांनी श्रावण महिन्यात विशेषतः नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करावा. त्यानंतर गरजू ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दान धर्म करावा. 

>>ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नाशिकचे पवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्यास काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते.

>>जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल तर त्या व्यक्तीने गळ्यात ८, ९ आणि १० मुखी रुद्राक्ष धारण करावे. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप नियमितपणे करावा.

>>ज्यांना कालसर्प दोष शांती करणे परवडणार नाही, अशा लोकांनी काल सर्प दोष निवारण स्तोत्र नागपंचमीला म्हणावे, असे ज्योतिष शास्त्र सांगते. 

>>ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण महिन्यात राहु-केतूच्या मंत्रांचा नियमित जप केल्याने काल सर्प दोषाचा प्रभावही कमी होऊ शकतो.

नाग पंचमी २०२२ शुभ मुहूर्त

  • यंदा पंचमी तिथी २ ऑगस्ट रोजी पहाटे ५. १४ ते ३ ऑगस्ट ५. ४२ पर्यंत असेल. 
  • या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त २ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४२ ते ८.२४ पर्यंत असेल.

Web Title: Nag Panchami 2022: Do 'These' Effective Remedies On Naag Panchami To Get Rid Of Kalsarp Dosha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.