Narendra Modi Birthday: १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस; त्यांच्या कुंडलीतच आहे 'राजयोग'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 06:39 PM2023-09-16T18:39:29+5:302023-09-16T18:40:06+5:30

Narendra Modi Horoscope: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी ७४ व्या वर्षात पदार्पण करतील; त्यानिमित्ताने ज्योतिषांचे त्यांच्या कुंडलीबद्दल भाकीत जाणून घेऊ. 

Narendra Modi Birthday: Prime Minister Narendra Modi's birthday on September 17; There is 'Raja Yoga' in their horoscope! | Narendra Modi Birthday: १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस; त्यांच्या कुंडलीतच आहे 'राजयोग'!

Narendra Modi Birthday: १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस; त्यांच्या कुंडलीतच आहे 'राजयोग'!

googlenewsNext

ज्योतिष सांगतात, पंतप्रधान मोदी यांच्या कुंडलीत सध्या जुळून आला आहे रुचक योग! हा योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानला जातो आणि तो राजयोग प्रदान करतो.. त्याच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती बलवान, पराक्रमी, धैर्यवान आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहते. याशिवाय व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता जबरदस्त असते. या योगाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती क्रिकेटपटू, सैन्यातील अधिकारी, राजकारणी, मंत्री आणि विविध प्रकारच्या सुरक्षा सेवांमध्ये नाव कमावते.

कुंडलीत अनेक प्रकारचे योग नक्षत्र आणि ग्रहांवरून तयार होतात. त्यातील काही शुभ तर काही अशुभ परिणाम देतात. कुंडलीतील शुभ योगांमुळे प्रगती होते. तर अशुभ योगामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्या आणि संकटे येतात. तूर्तास आपण शुभ फळ देणाऱ्या रुचक योगाबद्दल जाणून घेऊ. कुंडलीत रुचक योग काय आहे आणि त्याचे कोणते फायदे होतात बघा. 

रुचक योगाचे फायदे

ज्योतिष शास्त्रात रुचक योग शुभ मानला जातो. त्याच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती बलवान, पराक्रमी, धैर्यवान आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहते. याशिवाय व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता जबरदस्त असते. या योगाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती क्रिकेटपटू, सैन्यातील अधिकारी, राजकारणी, मंत्री आणि विविध प्रकारच्या सुरक्षा सेवांमध्ये नाव कमावते. ग्रह स्थिती बदलत असते. त्यानुसार हे योग जुळत असतात. ज्योतिषांच्या मते सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुंडलीत रुचिक योग तयार झाला आहे. त्याचा प्रभाव आपण सगळेच जण पाहत आहोत. 

रुचक योग जुळून आला हे कसे कळते? 

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या पहिल्या घरात रुचक योग तयार झाला तर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या बलवान, पराक्रमी बनते. व्यवसायातही यश मिळते. याशिवाय वैवाहिक जीवनात खूप आनंद मिळतो. कुंडलीच्या चौथ्या आणि सातव्या घरात रुचक योग तयार झाला तर व्यक्तीला समाजात खूप प्रतिष्ठा मिळते. तसेच, जर कुंडलीच्या १० व्या घरात हा योग तयार झाला असेल तर त्या व्यक्तीला राजकारणी किंवा मंत्री म्हणून खूप प्रतिष्ठा मिळते. हे वाचल्यावर मोदींच्या कुंडलीच्या कितव्या घरात रुचक योग जुळून आला आहे हे तुम्ही सुद्धा सहज सांगू शकाल!

मात्र 'अशा' स्थितीत रुचक योग अशुभ फल देतो -

कुंडलीत मंगळ शुभ असेल तेव्हाच रुचक योग शुभ फल देतो. अन्यथा कुंडलीत मंगळ अशुभ स्थितीत असेल तर मांगलिक दोष निर्माण होतो. याउलट मंगळावर दोन किंवा अधिक अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर रुचक योग शुभ फळ देत नाही. याशिवाय कुंडलीत मांगलिक दोष, पितृदोष किंवा काल सर्प दोष असला तरीही हा योग शुभ परिणाम देत नाही. त्यामुळे व्यक्ती अनैतिक गोष्टी करू लागते. 

रुचक योगाचे लाभ आणि तोटे वाचल्यावर तुम्हालाही आपल्या कुंडलीत हा योग कधी जुळून येणार याबद्दल उत्सुकता लागली असेल ना? यासाठी तुम्हाला ज्योतिषांचे मार्गदर्शन लागेल आणि जेव्हा हा योग जुळून येईल तेव्हा तुम्ही जगाला मार्गदर्शन करण्यास सक्षम व्हाल!

Web Title: Narendra Modi Birthday: Prime Minister Narendra Modi's birthday on September 17; There is 'Raja Yoga' in their horoscope!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.