Narmada Jayanti 2023: 'महाप्रलय झाला तरी नर्मदा लुप्त होणार नाही' असे तिला वरदान आहे; वाचा ठळक वैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 02:35 PM2023-01-28T14:35:21+5:302023-01-28T14:36:45+5:30

Narmada Jayanti 2023: आपल्याकडे १८ पुराणं आहेत, मात्र नदी म्हणून फक्त नर्मदेचे पुराण आहे, आज तिची जयंती; त्यानिमित्त वाचा सिद्ध मंत्र आणि मुख्य वैशिष्ट्य!

Narmada Jayanti 2023: 'Narmada will not disappear even if there is a deluge'; Read the highlights of river Narmada! | Narmada Jayanti 2023: 'महाप्रलय झाला तरी नर्मदा लुप्त होणार नाही' असे तिला वरदान आहे; वाचा ठळक वैशिष्ट्य!

Narmada Jayanti 2023: 'महाप्रलय झाला तरी नर्मदा लुप्त होणार नाही' असे तिला वरदान आहे; वाचा ठळक वैशिष्ट्य!

googlenewsNext

>> राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज, अमळनेर

आज माघ शुद्ध सप्तमी (७),म्हणजेच "श्री रथसप्तमी" म्हणजेच श्रीनर्मदा जयंती". आज आपण सारे पुण्यसलीला श्री नर्मदा मैया मध्ये स्नानासाठी गेला असाल. ज्यांना शक्य नाही ते घरीच श्री नर्मदा मय्याचे स्मरण, चिंतन व मानसिक पूजन करतील, ते करावे अशी अपेक्षा व आग्रह. स्नानाला बसण्यापूर्वी आपण श्री नर्मदा मैया चे स्मरण करून मगच स्नानास सुरुवात करावी. आपणा साठी श्री नर्मदा मैया चा ध्यानमंत्र व स्नान मंत्र व नवार्ण मंत्र येथे देत आहे. त्याचा जरूर लाभ घ्यावा हि प्रार्थना.

मय्याचा ध्यान मंत्र

व्याख्या मुद्रां प्रवरद करे दक्षिणे धारयंतीं। वामे लिंगं सलील कलशं भूषयंतीं वरेण्याम्।   
अंभोजस्थां मकर रथगां दिव्य सौंदर्य मूर्तीं। वंदे रेवां कलकल रवां शंभू कन्यां शरण्याम।।

मय्याचा  तारक मंत्र :- नर्मदायै नमः प्रातर्नर्मदायै नमो निशी ।  नमस्ते नर्मदे देवी त्राहिमां भवसागरात ।।

मय्याचा नवार्ण मंत्र :- ओम र्हीं श्रीं नर्मदायै नमः ।।

अशा प्रकारे मैयाचे स्मरण करून मग स्नान वंदन पूजन अर्चन इत्यादी विधी करावेत ही प्रार्थना. जाणून घेऊया तिची ठळक वैशिष्ट्य!

१) आपल्याकडे १८ पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही.
२) नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा.
३) नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता.
४) भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते.
५) इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे.
६) वेगवेगळ्या प्रकारचे बाण (पूजेत असतात) भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात.
७) नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्या बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही, आता पावेतो मर्यादेतच आहे.
८) महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे.
९) नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात.
१०) नर्मदेच्या पात्रातील मोठमोठया दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे.
११) श्रीनर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा (पीठ) काटा (जळाऊ काटक्या) भाटा (दगड) याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही.
१२ ) नर्मदा जयंतीला (रथ सप्तमीला) सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून, लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात.
१३) भारतातील सर्वाधिक योगी, संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जल समाधी घेतली आहे.
१४ ) भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम, नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी/ट्रस्ट आजही हजारो वर्षांपासून आजही घेतात.
१५ ) आजही परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत.
१६ ) ३५०० की मी ची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात, मैय्या त्यांची काळजी आईपेक्षाही ज्यास्त घेते, फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प! पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा हा विलक्षण अनुभव घ्यावा! 

संपर्क :  94 222 84 666/ 79 72 00 28 70

Web Title: Narmada Jayanti 2023: 'Narmada will not disappear even if there is a deluge'; Read the highlights of river Narmada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.