Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:07 AM2024-04-30T11:07:52+5:302024-04-30T11:08:13+5:30
Narmada Pushkaram 2024: १ ते १२ मे रोजी नर्मदा पुष्करम पर्व सुरू होत आहे, वृषभ राशीत गुरु संक्रमण झाले की हे पर्व सुरू होते व या पर्वात नर्मदा स्नानाला महत्त्व असते!
>> सर्वेश फडणवीस
नर्मदा !! अखंड, वैराग्य आणि आनंद देणारी नदी. आज तिची जयंती. नर्मदा नदी जगातल्या प्राचीन नद्यांपैकी एक. धार्मिक आणि आध्यात्मिक कारणासाठी जगामध्ये एकमेव नदी जिची संपूर्ण प्रदक्षिणा करू शकतो. ठराविक यम-नियम पाळून हीची प्रदक्षिणा नक्कीच अंतर्मुख करते. नर्मदा ही आनंददायिनी, सुख व कल्याण करणारी आहे. एक वर्णन असंही वाचण्यात आहे की; गंगा ज्ञान देते, यमुना आनंद देते, सरस्वती वैराग्य देते; आणि नर्मदा ज्ञान, वैराग्य, आनंद तिन्ही देते.
सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं
द्विषत्सु पापजातजातकादिवारिसंयुतम् ।
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ।।
आजोळ जबलपूरला असल्यामुळे नर्मदेचे चे दर्शन नियमित होतेच. अतिशय विशाल पात्र असलेले ठिकाण म्हणजे ग्वारीघाट. शहरापासून जवळ असलेले आणि स्वच्छ पात्र असलेले असे हे ठिकाण. या ठिकाणी व पुढे भेडाघाटच्या संगमरवरी खडकात शांत झालेली नर्मदा आणि धुवांधारला रौद्र आवाज करत कोसळणारी नर्मदा हीचे दोन विविध रूपे एकाच ठिकाणी बघायला मिळतात.
नर्मदेचा सुंदर किनारा, किनाऱ्यावरची वने, विस्तीर्ण होत जाणारे तिचे पात्र, साधू संतांच्या तपसाधनेने पवित्र झालेला परिसर म्हणजे नर्मदा नदी.
आज माघ शु. ७ म्हणजेच रथसप्तमी या तिथीला नर्मदा पृथ्वीवर अवतीर्ण झाली म्हणून हा दिवस "नर्मदा जयंती" म्हणून साजरा करतात.
॥ श्री नर्मदा अष्टकम ॥
सबिंदु सिन्धु सुस्खल तरंग भंग रंजितम
द्विषत्सु पाप जात जात कारि वारि संयुतम
कृतान्त दूत काल भुत भीति हारि वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥1॥
त्वदम्बु लीन दीन मीन दिव्य सम्प्रदायकम
कलौ मलौघ भारहारि सर्वतीर्थ नायकं
सुमस्त्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक् शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥2॥
महागभीर नीर पुर पापधुत भूतलं
ध्वनत समस्त पातकारि दरितापदाचलम
जगल्ल्ये महाभये मृकुंडूसूनु हर्म्यदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥3॥
गतं तदैव में भयं त्वदम्बु वीक्षितम यदा
मृकुंडूसूनु शौनका सुरारी सेवी सर्वदा
पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥4॥
अलक्षलक्ष किन्न रामरासुरादी पूजितं
सुलक्ष नीर तीर धीर पक्षीलक्ष कुजितम
वशिष्ठशिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥5॥
सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षटपदै
धृतम स्वकीय मानषेशु नारदादि षटपदै:
रविन्दु रन्ति देवदेव राजकर्म शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥6॥
अलक्षलक्ष लक्षपाप लक्ष सार सायुधं
ततस्तु जीवजंतु तंतु भुक्तिमुक्ति दायकं
विरन्ची विष्णु शंकरं स्वकीयधाम वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥7॥
अहोमृतम श्रुवन श्रुतम महेषकेश जातटे
किरात सूत वाड़वेषु पण्डिते शठे नटे
दुरंत पाप ताप हारि सर्वजंतु शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥8॥
इदन्तु नर्मदाष्टकम त्रिकलामेव ये सदा
पठन्ति ते निरंतरम न यान्ति दुर्गतिम कदा
सुलभ्य देव दुर्लभं महेशधाम गौरवम
पुनर्भवा नरा न वै त्रिलोकयंती रौरवम ॥9॥