कोरड्या डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:03 PM2020-04-09T18:03:50+5:302020-04-09T18:04:32+5:30

डोळे कोरडे पडत आहेत? सद्गुरु एक सोपा नैसर्गिक उपाय सांगतात ज्यामधे एक अतिशय अनपेक्षित घटक वापरला जातो!

A natural remedy for dry eye problems | कोरड्या डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय

कोरड्या डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय

googlenewsNext

सद्गुरु: आम्ही तुम्हाला रडवायलाच हवे! सामान्यतः, बहुतांश लोकं जेंव्हा डोळे कोरडे पडल्याची तक्रार करतात, तेंव्हा डोळे पुर्णपणे कोरडे नसतात, त्यांच्यात काही विशिष्ट प्रमाणात कोरडेपणा जाणवत असतो. जर एखादी शस्त्रक्रिया झालेली असेल, किंवा डोळ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली असेल, ज्यामुळे भरून न येणारे नुकसान झाले असेल, तर तुम्हाला औषधांच्या दुकानात मिळणार्‍या डोळ्यामधून अश्रु आणण्यासाठी घालायच्या औषधांच्या थेंबांसारखे काही उपाय करावे लागतील. पण जर तसे नसेल आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झालेली नसेल, तर तसे करण्यासाठी इतरही मार्ग आहेत.

योगामधे अशा काही क्रिया आहेत ज्याद्वारे आपण आपल्या अश्रुंच्या ग्रंथी सक्रिय करू शकता, पण तुम्ही वापरू शकणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे राखाडी भोपळ्याचा वापर करणे. ही एक भाजी आहे जिला अमेरिकेत हिवाळी टरबूज या नावाने ओळखले जाते. ही एक हिरवट-राखाडी रंगाची भाजी आहे, जिच्यावर मातकट राखाडी रंग असतो. तुम्ही ते पुसले तर तो तुमच्या हाताला लागतो, म्हणूनच त्याला राखाडी भोपळा असे म्हंटले जाते. तुम्ही तो किसलात, तर तो खूपच रसदार असतो. त्यामधून सहज पाणी वाहात येते. तुम्ही तो कीस पाण्याने थबथबलेला असताना घेऊन तुमच्या डोळ्यांवर त्याचा एक थर ठेऊन दहा मिनिटे पडून रहा. त्यानंतर तो काढून टाका आणि थंड पाण्याने डोळे धुवा. याची मदत होईल.

Web Title: A natural remedy for dry eye problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.