Navratri 2021 : भूत, प्रेत, बाधा अशा विनाशकारी शक्ती जिच्या तेजाने दूर पळतात, ती देवी कालरात्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:10 AM2021-10-13T11:10:49+5:302021-10-13T11:13:09+5:30
Navratri 2021: ही शक्ति ग्रह बाधा, पाणी, जंतु व शत्रूला दूर करते. हिच्या कृपेने भक्ताचे सर्व भय, शोक, मनस्ताप व सर्व संकटातून सुटका होते, अकाल मृत्युला भक्ताजवळ फिरकू न देणारी व शुभंकरी शक्ति आहे.
अश्विन शुद्ध सप्तमी म्हणजेच घटाची सातवी माळ या दिवशी दुर्गेच्या “काल रात्री” या शक्तीची उपासना केली जाते. साधकाला काटेकोरपणे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह व शौच,संतोष, स्वाध्याय , तप, ईश्वर प्राणिधाम ही पाच तत्वे काटेकोरपणे पाळावी लागतात कारण ही शक्ति सर्व सिद्धीयात्री आहे. हिचे स्थान सहस्त्रार चक्रात आहे. हिच्या आराधनेने ब्राहमांडातील सर्व सिदधींचे दरवाजे भक्तासाठी उघडतात. या शक्तीच्या उपासनेने भूत,प्रेत, ई वाईट शक्ति दूर पळतात.
ही शक्ति ग्रह बाधा, पाणी, जंतु व शत्रूला दूर करते. हिच्या कृपेने भक्ताचे सर्व भय, शोक, मनस्ताप व सर्व संकटातून सुटका होते, अकाल मृत्युला भक्ताजवळ फिरकू न देणारी व शुभंकरी शक्ति आहे. या देवीचे स्वरूप नावाप्रमाणे काल रात्री आहे.. हिचे त्रीनेत्र असून हिचे डोळे काळाप्रमाणे अति विशाल आणि वर्तुळाकार आहेत. ही काळ्या वर्णा ची चतुर्भुजा आहे.. हिचा केशसांभार खुला व पाठीवर विखुरलेला आहे. हिच्या मुखातून प्रचंड ज्वाळा निघतात व जीभ खूप लांब आणि लाल भडक आहे. हिचे वाहन गाढव असून रूप अत्यंत भयावह आहे. या शक्तीला काली म्हणून सुद्धा पूजली जाते. ही देवी तंत्र विद्येसाठी प्रसिद्ध असून, जरी रंग काळा असला तरी सर्व गुणदोष सामावून घेणारा आहे. ही देवी भक्तांना अभय देणारी असून दुर्बल व्यक्तिला बळ देणारी आहे.
सप्तश्रुंगी गडावरील सप्तश्रुंगी माता या देवीचे शक्तीरूप आहे, हिच्या आगमनाने पर्वतमय डोंगराळ भागाचे औषधी वृक्ष तिच्या पदस्पर्शाने निर्माण झाले, सृजनांचे कल्याण करणारी ही अधीष्टात्री आहे. हिचे ध्यान केल्याने अनिमा, लघिमा,गरिमा,महिमा, प्राप्ती, प्रकाम्या, ईशीत्व आणि विशीत्व या अष्ट सिद्धि प्राप्त होतात.
शुंभ – निशुंभ, अहिरावण – महीरावण, इ दांनावांचा नाश करण्यासाठी दूर करण्यासाठी दुर्गेने हे विक्राळ रूप धारण केले आहे. पौराणिक कथेनुसर रक्तबीज असुर की याच्या ऐका रक्ताच्या थेंबापासून अनेक असुर निर्माण होत , त्याच्या विनाश करण्यासाठी दुर्गेने हे रूप धारण केले. ही देवी शुभांकरी असल्यामुळे तिचे आशीर्वाद प्राप्त झाले तर शुभ कामांची यादीच तयार होवू लागते. या देवीलाच महाकाली, भद्रकाली, चामुंडा, चंडी इ नावाने ओळखले जाते..
तिचा उपासना मंत्र पुढीलप्रमाणे आहे -
या देवी सर्वभूतेषु कालरात्री रूपेण संस्थिता:
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।
बीज मंत्र - ऊँ ऐं ऱ्हीम क्लिं कालरात्रै नम:।