Navratri 2021 : शैक्षणिक अडचणींवर मात करण्यासाठी अश्विन शुद्ध सप्तमीला विद्यार्थ्यांनी 'या' पद्धतीने करावे सरस्वती पूजन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 05:31 PM2021-10-11T17:31:18+5:302021-10-11T17:31:51+5:30

Navratri 2021 : ज्यांना सरस्वतीच्या कठीण मंत्राचा जप करता येत नाही, त्यांच्यासाठी येथे सरस्वतीचा साधा मंत्र येथे देत आहे.

Navratri 2021: Students should perform Saraswati Pujan on Ashwin Shuddha Saptami in this way to overcome academic difficulties! | Navratri 2021 : शैक्षणिक अडचणींवर मात करण्यासाठी अश्विन शुद्ध सप्तमीला विद्यार्थ्यांनी 'या' पद्धतीने करावे सरस्वती पूजन!

Navratri 2021 : शैक्षणिक अडचणींवर मात करण्यासाठी अश्विन शुद्ध सप्तमीला विद्यार्थ्यांनी 'या' पद्धतीने करावे सरस्वती पूजन!

Next

शारदीय नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अश्विन शुद्ध षष्ठीला सरस्वतीचे आगमन होते आणि सप्तमीला पूजन. आपण दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करतोच, परंतु नवरात्रीत सरस्वतीची खरी पूजा सप्तमीला सुरू होऊन दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी पूर्ण होते. ही पूजा आपण सर्वांनी केली पाहिजे. विशेषतः विद्यार्थ्यांनी ही पूजा केली असता अनेक लाभ होतात, असे शास्त्र सांगते. ते उपाय जाणून घेऊ. 

प्रत्येकासाठी नवरात्रीचे महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये, विद्यार्थ्यांनी देवी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. ज्यांना सरस्वतीच्या कठीण मंत्राचा जप करता येत नाही, त्यांच्यासाठी येथे सरस्वतीचा साधा मंत्र येथे देत आहे. नवरात्रीमध्ये या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली असता, त्यात सातत्य ठेवून नित्य पठण केल्यास ज्ञान आणि बुद्धीमध्ये वाढ होते. पुढील मंत्र म्हणा - 

 'ॐ शारदा माता ईश्वरी मैं नित सुमरि तोय हाथ जोड़ अरजी करूं विद्या वर दे मोय।'

सरस्वती मातेची कृपादृष्टी लाभून शैक्षणिक मार्गातील सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणून हा मंत्रजप केला जातो. 

शारदा शारदांभौजवदना, वदनाम्बुजे। सर्वदा सर्वदास्माकमं सन्निधिमं सन्निधिमं क्रियात्।

शरद ऋतूत जन्माला आलेली, कमळासारखा प्रफुल्लित  चेहरा असलेली आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी शारदा तुझी कृपा माझ्यावर सदैव राहू दे. 

सरस्वतीचा बीज मंत्र 'क्लिं' आहे. शास्त्रांमध्ये, क्लिंकरी कामरूपीनाय अर्थात 'क्लिं' कार्याच्या रूपात आदरणीय आहे. पुढील मंत्र हा सिध्दिमंत्र आहे. यालाच सरस्वतीचा दिव्य मंत्र असेही म्हटले जाते. 

सरस्वती गायत्री मंत्र : 'ॐ वागदैव्यै च विद्महे कामराजाय धीमहि। तन्नो देवी प्रचोदयात्‌।'

हा मंत्र पटकन पाठ होण्यासारखा आहे. या मंत्राचा जप करत ५ वेळा जपमाळ ओढावी. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित होऊन यश प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी ध्यान करण्यासाठी त्राटक केले पाहिजे. दररोज १० मिनिटे त्राटक केल्याने स्मरणशक्ती वाढते. त्याला उपासनेची जोड म्हणून सरस्वतीचे सिद्धमंत्र नियमित म्हणावेत. जपाचे सामर्थ्य असे की, की त्यामुळे इतर विषयांतून लक्ष दूर होऊन अभ्यासात केंद्रित होते. त्यामुळे अभ्यासात प्रगती होण्यास मदत होते. 

Web Title: Navratri 2021: Students should perform Saraswati Pujan on Ashwin Shuddha Saptami in this way to overcome academic difficulties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.