Navratri 2021 : सुख व सौभाग्यप्राप्तीसाठी महाअष्टमीला करा देवीची पूजा आणि महागौरी स्तोत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 08:00 AM2021-10-13T08:00:00+5:302021-10-13T08:00:06+5:30
Navratri 2021 : महागौरीची पूजा केल्याने अशक्य कामे सुद्धा शक्य होतात, सर्व पापांचा नाश होतो, सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
नवरात्रीतील दुर्गा पूजेच्या वेळी अष्टमीच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी दुर्गा मातेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. तिच्या गौर वर्णामुळे आणि तिच्यथायी असलेल्या शक्तीमुळे तिला महागौरी म्हटले जाते. यंदा १३ ऑक्टोबर रोजी नवरात्रीतील अष्टमी तिथी आहे. या दिवशी पुढे दिलेल्या माहितीनुसार देवीची पूजा आणि उपासना करा.
महागौरीची दुर्गाष्टमी पूजा पद्धत:
नवरात्रीचा आठवा दिवस शक्ती स्वरूप महागौरीचा दिवस आहे. या दिवशी कुमारिकांचे पूजन करून त्यांना जेवू खाऊ घातले जाते. सुवासिनींची ओटी भरली जाते. देवीची ओटी भरली जाते. व देवीच्या महागौरी रूपाचे ध्यान केले जाते.
Navratri 2021 : कुमारिका पूजनाशिवाय नवरात्रोत्सव अपूर्ण का मानला जातो, हे जाणून घ्या!
हात जोडून या मंत्राचा जप करा-
'सिद्धगन्धर्वयक्षा द्यैरसुरै रमरैरपि। सेव्या माना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी॥'
या मंत्राचे पठण केल्यानंतर, महागौरी देवीच्या विशेष मंत्रांचा जप करा आणि आईचे ध्यान करा आणि तिला सुख आणि सौभाग्याची प्रार्थना करा.
महागौरीचा मंत्र :
श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।
या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
महागौरी स्तोत्र :
सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम्॥
सुख शान्तिदात्री धन धान्य प्रदीयनीम्।
डमरूवाद्य प्रिया अद्या महागौरी प्रणमाभ्यहम्॥
त्रैलोक्यमंगल त्वंहि तापत्रय हारिणीम्।
वददं चैतन्यमयी महागौरी प्रणमाम्यहम्॥
माता महागौरी ध्यान :
वन्दे वांछित कामार्थे चन्द्रार्घकृत शेखराम्।
सिंहरूढ़ा चतुर्भुजा महागौरी यशस्वनीम्॥
पूर्णन्दु निभां गौरी सोमचक्रस्थितां अष्टमं महागौरी त्रिनेत्राम्।
वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजेम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालंकार भूषिताम्।
मंजीर, हार, केयूर किंकिणी रत्नकुण्डल मण्डिताम्॥
प्रफुल्ल वंदना पल्ल्वाधरां कातं कपोलां त्रैलोक्य मोहनम्।
कमनीया लावण्यां मृणांल चंदनगंधलिप्ताम्॥
माता महागौरी कवच :
ओंकारः पातु शीर्षो मां, हीं बीजं मां, हृदयो।
क्लीं बीजं सदापातु नभो गृहो च पादयो॥
ललाटं कर्णो हुं बीजं पातु महागौरी मां नेत्रं घ्राणो।
कपोत चिबुको फट् पातु स्वाहा मा सर्ववदनो॥
ॐ देवी महागौर्यै नमः॥
अशाप्रकारे महागौरीची पूजा केल्याने अशक्य कामे सुद्धा शक्य होतात, सर्व पापांचा नाश होतो, सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते.