Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 01:07 PM2024-09-25T13:07:58+5:302024-09-25T13:09:04+5:30
Navratri 2024: ३ ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरु होत आहे, या नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन कधी व कसे करायचे ते जाणून घ्या.
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
शरणागत दीनार्त परित्राण परायणे।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणी नमोऽस्तु ते॥
कुंकुमार्चन म्हणजे काय ? तर देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक .काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे. हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्रजागर होणे आवश्यक आहे. ‘देवीचा जप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत वहावे अथवा देवीचा नामाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे. ३ ऑक्टोबर रोजी नवरात्र (Navratri 2024) सुरु होत आहे, या नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन कधी व कसे करायचे ते जाणून घ्या.
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
मूळ कार्यरत शक्तींतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीजतत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणार्या् गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीरतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्याज सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.
कुंकुमार्चन अभिषेक केलेले कुंकू लावून केला गेलेला जप आणि साधना अधिक एकाग्रतेने होते. कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचे रूप आहे, असा भाव ठेवून, घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतो. कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवी समोर उभी आहे, असा भाव ठेवा. देवीचा नामजप करत एकाग्रतेने चिमूट-चिमूट कुंकू चरणांपासून मस्तकापर्यंत वहा. ही पूजा स्त्री /पुरुष कुणीही करू शकतात .ह्याला कसलेच बंधन नाही. काही ठिकाणी कुंकवाचे स्नान घालतात किंवा केवळ चरणांवर वहातात. देवीला लावलेले कुंकू भक्तीभावाने स्वतःला लावा. कुंकुमार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्तीतत्त्व कुंकवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो. आपली श्रद्धा जितकी जास्ती तितकी अनुभूती जास्ती.
बाजारात कुंकू मिळते .पूजेचे ,अभिषेकाचे कुंकू सांगावे .ते महाग आहे म्हणून साधे वापरू नये. हातावर खूप काळ रंग चिकटून रहाणारे रासायनिक पदार्थांचा अधिक वापर असणारे कुंकू वापरणे टाळा. कधी कधी कुंकू हे फारच लाल चुटुक असते आणि ते छान दिसते म्हणून बायका घेतात पण त्यात रसायने असतात. ते घेवू नये. रंगावर भुलून जावू नये.
कुंकुमार्चन करताना श्रीसूक्ताचा पाठ १५ वेळा करावा. १६ व्या वेळी संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुतीही म्हणावी म्हणजे श्रीसूक्ताचे 1 आवर्तन झाले. काही ठिकाणी सामुहिक रीतीने हि पूजा करतात. चंदनाची उदबत्ती मिळाली तर जरुर लावावी . सर्व पूजा झाल्यावर एका ताटात खण नारळ घेवून घरातल्या देवीची ओटी भरावी. डाळिंब मिळाले तर आणावे .देवीस ते फार प्रिय आहे. नवरात्रीचे ९ दिवस एका निरांजनात अगदी लहान कापूर घेवून तो प्रत्येक खोलीत जाळावा. घराला ४ खोल्या असतील तर प्रत्येक खोलीत ते निरंजन घेवून जावे आणि तिथे एक कापुराची वडी त्यात जाळावी .मग ते उचलून दुसरी खोलीत न्यावे आणि पुन्हा तेच करावे....याने घरात अत्यंत सकारात्मक उर्जा आणि लहरी निर्माण होतात .करून पहा..
नवरात्रीच्या ९ दिवसापैकी कुठल्याही एका दिवशी जमल्यास अष्टमीला किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार असेल त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावे.
पूजेचे साहित्य : २ ताम्हने,हळदकुंकू ,विडा,सुपारी,५ फळे ,कापसाचे वस्त्र , पूजेस बसावयास आसन,अत्तर ,सर्व प्रकारची सुवासिक फुले,देवीस गजरा ,वेणी , निरंजन ,समई , सुटते पैसे ,धूप-दीप ,नेवैद्यास साखर घातलेले गोड दुध ,पेढे, घरी केलेला गोड पदार्थ आणि दुपारी महानैवेद्य. दिवसभर समई लावून ठेवावी.
पूजेस बसण्यापूर्वी घरातील मोठ्या मंडळीना नमस्कार करावा. धूतवस्त्र वेसावे. पुरुष पूजेस बसणार असतील तर जानवे घालावे. देवीची देव्हार्यातील मूर्ती एका ताम्हनात घेवून चौरांगावार किंवा पाटावर ठेवावि. तिला शुद्धोधकाने ,मग सुवासिक पाण्याने ,दुधाने आंघोळ घालून ,पुसून हळदकुंकू लावावे .फुलाने अत्तर लावावे , मग कुंकुमार्चनास सुरवात करावी.
जप : ओं श्री महालक्ष्मै मातायै नमः
सर्वात महत्वाचे : नुसते कुंकुमार्चन करून देवी प्रसन्न होईल का? नाही. समस्त स्त्रियांमध्ये तिचा वास आहे . घरातील गृहलक्ष्मी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. तिचाही घरातील योग्य तो मान ठेवावा आणि तिनेही इतरांचा मान ठेवावा . मुलांनीही आपल्या आईला रोज नमस्कार करावा . आपल्या घरातील महालक्ष्मीला दुर्लक्षित केले तर गाभाऱ्यातील कशी पावणार नाही का?
स्त्रिया हळदीकुंकू करतात आणि अनेकदा कुणाचे तरी शत्रुत्व किंवा काही बिनसते म्हणून एखाद्या मैत्रिणीला बोलवत नाहीत . त्यामुळे ती दुखावली जाते . हळदी कुंकवाला कुणालाही वगळू नका , इतर स्त्रिया सुद्धा तिला विचारतात तुला बोलावले नाही का? मग ती अजूनच दुखी होते अशी मनातून मुद्दामून दुखावलेली मने अनेकदा आपल्या सर्व नाशास सुद्धा कारणीभूत ठरतात . आपण आपल्याकडून सर्वाना निमंत्रण द्यावे हेच सांगायचे आहे. नाहीतर कुणालाच बोलावू नका पण कुणी राहून जायला नको . राग लोभाच्या पलीकडे जाणे म्हणजे महाराजांच्या चरणाशी पोहोचणे . आपल्याला काय महत्वाचे आहे ? खोटा अहंकार ? कि आपले सद्गुरू हे प्रत्येक स्त्रीने ठरवावे .
नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या पण नेसा पण निदान नऊ स्त्रियांची मने जपा , एकोपा वृद्धिंगत होवूदे , आपल्या कुठल्याही कारणाने दुरावलेल्या सख्या ह्या निम्मित्ताने पुन्हा एकत्र येउदे .
संपर्क : 8104639230