Navratri Mahotsav 2023: देवीची ही १०८ नावं घ्या आणि बसल्या जागी करा उपासनेला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:25 PM2023-10-16T12:25:43+5:302023-10-16T12:26:46+5:30

Navratri Mahotsav 2023: देवीचे नवरात्र सुरू झाले आहे आणि तिची उपासना करायची इच्छा आहे पण वेळेअभावी ते शक्य होत नाही? मग या नावांचा जप सुरू करा!

Navratri Mahotsav 2023: Take these 108 names of Goddess and start worshiping in a seated position! | Navratri Mahotsav 2023: देवीची ही १०८ नावं घ्या आणि बसल्या जागी करा उपासनेला सुरुवात!

Navratri Mahotsav 2023: देवीची ही १०८ नावं घ्या आणि बसल्या जागी करा उपासनेला सुरुवात!

देवीच्या नवरात्रीत विविध प्रकारे शक्ती उपासना केली जाते. कोणी व्रत वैकल्य करतात, कोणी होम हवन करतात, कोणी उपास तापास करतात, तर कोणी ग्रंथवाचन करतात. प्रत्येकाची उपासनेची पद्धत वेगळी. मात्र काही जणांना इच्छा असूनही उपासना करता येत नाही, कारण वेळेचा अभाव असतो. अशा वेळी शुभ मुहूर्ताची, संधीची वाट न पाहता, दोन हस्तक म्हणजे दोन हात जोडून आणि मस्तक झुकवून बसल्या जागी उपासनेला सुरुवात करता येते. त्यासाठी देवीची अष्टोत्तरशतनामावली देत आहे. या नामांचे वाचन केल्यामुळे  साधकाला जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते.

सतीसाध्वीभवप्रीताभवानीभवमोचनीआर्या
दुर्गाजयाआद्यात्रिनेत्राशूलधारिणीपिनाकधारिणी
चित्राचंद्रघंटामहातपामनबुद्धिअहंकारा
चित्तरूपाचित्राचितिसर्वमंत्रमयीसत्तासत्यानंदस्वरुपिणी
अनंताभाविनीभव्याअभव्यासदागतिशाम्भवी
देवमाताचिंतारत्नप्रियासर्वविद्यादक्षकन्यादक्षयज्ञविनाशिनी
अपर्णाअनेकवर्णापाटलापाटलावतीपितांबरपरिधानाकलमंजरीरंजिनी
अमेयविक्रमाक्रूरासुंदरीसुरसुंदरीवनदुर्गामातंगी
मतंगमुनिपूजिताब्राह्मीमाहेश्वरीऐंद्रीकौमारीवैष्णवी
चामुंडावाराहीलक्ष्मीपुरुषाकृतिविमलाउत्कर्षिनी
ज्ञानाक्रियानित्याबुद्धिदाबहुलाबहुलप्रिया
सर्ववाहनानिशुंभशुंभहननीमहिषासुरमर्दिनीमधुकैटभहंत्रीचंडमुंडविनाशिनीसर्वसुरविनाशा
सर्वदानवघातिनीसर्वशास्त्रमयीसत्यासर्वास्त्रधारिणीअनेकशस्त्रहस्ताअनेकास्त्रधारिणी
कुमारीएककन्याकैशोरीयुवतीयतिअप्रौढ़ा
वृद्धमाताप्रौढ़ाबलप्रदामहोदरीमुक्तकेशीघोररूपा
महाबलाअग्निज्वालारौद्रमुखीकालरात्रितपस्विनीनारायणी
भद्रकालीविष्णुमायाजलोदरीशिवदुतीकरालीअनंता
परमेश्वरीकात्यायनीसावित्रीप्रत्यक्षाब्रह्मावादिनी 


देवीच्या या सुंदर नावावरून नवजात बालिकेचे नावही आपण या नावांपैकी एक ठेवू शकतो. या नावांना अर्थ आहे आणि त्यामागे देवीच्या कर्तृत्त्वाचे पराक्रमदेखील आहेत. यासाठी देवीच्या नावांची उजळणी करा आणि नामजपही सुरू करा. जगदंब उदयोsssस्टु!!

Web Title: Navratri Mahotsav 2023: Take these 108 names of Goddess and start worshiping in a seated position!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.