New year resolution 2024: नवीन वर्षात ठरवलेल्या संकल्पांची पूर्तता व्हावी म्हणून लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:35 PM2023-12-28T14:35:21+5:302023-12-28T14:35:38+5:30

New year resolution 2024: नव्याचे नऊ दिवस म्हणत नवीन वर्षातील संकल्प बारगळू नयेत म्हणून काही बंधनं आधीच आपण आपल्यावर घातली पाहिजेत; कोणती ते पहा. 

New year resolution 2024: Remember 'these' things to fulfill the resolutions set in the new year! | New year resolution 2024: नवीन वर्षात ठरवलेल्या संकल्पांची पूर्तता व्हावी म्हणून लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

New year resolution 2024: नवीन वर्षात ठरवलेल्या संकल्पांची पूर्तता व्हावी म्हणून लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

>> अस्मिता दीक्षित 

नवीन वर्षाचे नवीन संकल्प केले जातात, पण चार दिवसात संकल्पात खंड पडतो. यासाठीच ठरवायचे काहीच नाही पुढे जात राहायचे . एखादी गोष्ट कृतीत उतरवणे महत्वाचे. आज आयुष्यत खूप काही करण्यासारखे आहे. रोज एकाला तरी हसवा , कुणाच्या दुक्खावर किंवा व्यंगावर हसण्यापेक्षा हे बरे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनी निदान एक तरी घटस्फोट वाचवा , एकाचे तरी match making मस्त करून द्या. खरे ज्ञान द्या . घटस्फोट  झालेली माणसे वाईट नसतात फक्त दोन वेगळा विचार करणारी माणसे एकत्र आलेली असतात . मार्केटिंग अजिबात नको फसवणूक नको. लोक हुशार आहेत त्यांना ते समजते आणि आपली पत जाते त्यापेक्षा खरे आपला ठसा उमटवून जाते तोही कायमचा . आज मार्केटिंग चा जमाना आहे. जो दिखता है वह बिकता है . पण लोकांकडून किती पैसे उकळायचे आणि किती टोप्या घालायच्या? असो.  सतत कुढत बसणे, जीवनात घडलेल्या वाईट आठवणी , प्रसंग माणसे ह्यांच्याभोवती रुंजी घालत बसणे म्हणजे स्वतःच्याच हाताने आयुष्याची माती करणे. इथे कुणाला कुणाचीही पडलेली नाही . 

१२ राशींची माणसे ह्या जगात आहेत ,काही मनाला लावून घेणारी आहेत तर काही आपल्याच स्वप्नांना पंख लावणारी आहेत. चला तर मग 2024 नवनवीन स्वप्ने बघुया ती पूर्ण करण्यासाठी धडपड करुया , अविश्रांत कष्टाने यशश्री खेचून आणूया आणि स्वतःच्या असण्याला एक नवीन अर्थ प्राप्त करून देवूया.

आज सोशल मिडीया प्रगत आहे त्याने खूप सुप्त लेखकाना जन्म दिला आहे. तुम्हीही आपले विचार शब्दबद्ध करा , लिहिते व्हा आणि विचारांना दिशा द्या. इतरांना प्रेरणा द्या . एखाद्या खळखळणार्या धबधब्या सारखे आयुष्य जगा, डबके होऊन जगण्यात मजा नाही . जिवंतपणे कत्येक मरणे जगणाऱ्या लोकांना जीवन जगायची प्रेरणा द्या. 

दुसऱ्याचा द्वेष करून, हेवे दावे ,मत्सर करून ह्या जगात कुणीही सुखी झाले नाही आणि होणारच नाही. उलट आपणच मानसिक रुग्ण होतो अश्याने . मनात महाराजांनाच आणून बसवले तर इतर टुकार विचारांना तिथे जागाच राहणार नाही. प्रयत्नपूर्वक हा प्रयत्न करून बघा. आज आर्थिक समस्या , विवाह , वास्तू , मुलांची शिक्षणे , व्यसने ,संतती न होणे अश्या अनेक विचारांनी मनुष्य त्रस्त आहे. आपल्या जराश्या स्मित हास्याने , दोन गोड शब्दांनी एखाद्याला जगायला स्फूर्ती मिळाली तर तो आनंद खरच अनमोल असेल.पटतंय का? मग लगेच कृती करूनच टाका.

2024 तुम्हा आम्हा सर्वांसाठी “ अनमोल “ असुदे , स्वप्नपूर्तीचे , आकाशाला गवसणी घालणारे ,आरोग्यदायी , दुसर्याला आनंद देणारे , अध्यात्माची गोडी चाखत महाराजांच्या चरणाशी आयुष्य समर्पित करणारे असुदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना . सकारात्मक जीवन जगायची गुरुकिल्ली आपल्याच कडे आहे आता फक्त ती वापरायची आहे. 

संपर्क : 8104639230

Web Title: New year resolution 2024: Remember 'these' things to fulfill the resolutions set in the new year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.