पुढच्या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला, दा. कृ. सोमण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 07:45 AM2024-01-16T07:45:39+5:302024-01-16T07:45:51+5:30

सन २००० मध्ये निरयन मकर संक्रांत २२ डिसेंबरला येत होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांत   १३ जानेवारीला आली होती.

Next year on Makar Sankranti 14th January, Da. Kr. Soman's information | पुढच्या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला, दा. कृ. सोमण यांची माहिती

पुढच्या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला, दा. कृ. सोमण यांची माहिती

ठाणे : पुढच्या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला असेल. निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो. यामुळे सन २०२५, २०२६, २०२९, २०३०, २०३३, २०३४, २०३७, २०४१, २०४२, २०४५, २०४६ आणि २०४९ या वर्षांमध्ये मकर संक्रांतीचा सण हा १४ जानेवारी रोजी येणार, अशी माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

सन २००० मध्ये निरयन मकर संक्रांत २२ डिसेंबरला येत होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांत   १३ जानेवारीला आली होती. सन १९७२ पर्यंत निरयन मकर संक्रांत १४ जानेवारीलाच येत असे.  सन १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांत कधी १४ जानेवारीला, तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल.

अशा रीतीने निरयन मकर संक्रांतीचा दिवस पुढे जात जात सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांत १ फेब्रुवारीला येणार आहे. गेल्या वर्षी १५ जानेवारीला मकर संक्रांत होती. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस, ६ तास, ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो.

उलट काळेच कपडे घाला
मकर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केल्यामुळे त्या दिवशी काळे वस्त्र घालू नका. काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे, अशी अफवा काही लोक पसरवत आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायला काहीही हरकत नाही. उलट थंडीत काळ्या रंगाची वस्त्रे ही शरीर उबदार ठेवतात. म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा असल्याचेही सोमण यांनी सांगितले.

 ग्रेगरीयन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर ते लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस ३ दिवसांनी पुढे जातो,  तसेच दरवर्षीचा ९ मिनिटे १० सेकंद हा काल साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. 

Web Title: Next year on Makar Sankranti 14th January, Da. Kr. Soman's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.