Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला गृहीणींनी शोधलेले पर्याय आणि भारुडकरांनी दिलेले शालजोडे; वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 11:16 AM2024-06-18T11:16:57+5:302024-06-18T11:17:23+5:30

Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला अन्न आणि पाणी दोन्ही ग्रहण करायचे नाही, हे सांगूनही सुगरण बायकांना काय पर्याय सुचतात याच भारुडात केलेलं वर्णन वाचा.

Nirjala Ekadashi 2024: Nirjala Ekadashi Alternatives Discovered by Housewives and taunting by spiritual poet; A must read! | Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला गृहीणींनी शोधलेले पर्याय आणि भारुडकरांनी दिलेले शालजोडे; वाचा!

Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला गृहीणींनी शोधलेले पर्याय आणि भारुडकरांनी दिलेले शालजोडे; वाचा!

भारूड हा शब्द उच्चरताच आठवण होते, ती संत एकनाथ महाराजांची. भारूड नामक काव्यातून समाजातील परिस्थितीचे मार्मिक वर्णन केले जाते. नाथ महाराजांनी सुरू करून दिलेली परंपरा अद्याप सुरू आहे. चंदाताई तिवाडी यांचा बुरगुंडा, निरंजन बाक्रे यांचा विंचू चावला, शाहीर साबळे यांचा दादला नको गं बाई अशी अनेक भारुडे आपण ऐकली असतील. अलीकडच्या काळात या सर्व कलाकारांनी त्याला आधुनिक विषयांची जोड देऊन भारूड काव्य जिवंत ठेवले आहे. त्यातलाच एक प्रकार आज निर्जला एकादशीच्या निमित्ताने खास लोकमत वाचकांसाठी... 

शिरपूर, धुळे जिल्हा येथील श्रीमती विजयाबाई गाडगीळ यांनी निर्जला एकादशीचे गमतीदार भारूड लिहिले आहे. 'एकादशी आणि दुप्पट खाशी' असे आपण नेहमी म्हणतो आणि तसे वागतोही. पण निर्जला एकादशीला तर पाणीही प्यायचे नसते. तसे असताना आपण पाण्याला पर्याय कसा शोधत जातो, याचे रसभरीत वर्णन त्यांनी या भारुडात केले आहे... 

बाई माझी एकादशी, एकादशी, 
पाणी पिऊ कशी? पाणी पिऊ कशी?
बाई माझी एकादशी।।

सुनेने केला सुंठवडा,
मला म्हणाली देऊ का थोडा, 
अहो आग झाली अशी, 
बाई माझी एकादशी ।।१।।

शेजारणीने केला शिंगाड्याचा शिरा,
मला म्हणाली देऊ का जरा, 
तिला नाही म्हणू कशी, 
बाई माझी एकादशी ।।२।।

मैत्रिणीने केले साबुदाण्याचे वडे,
त्यातले मी खाल्ले ५-७ थोडे, 
आता आणखी मागू कशी,
बाई माझी एकादशी ।।३।।

लेकीने केला दुधाचा चहा,
(आज निर्जला एकादशी आहे ना, म्हणून बिना पाण्याचा चहा)
मला म्हणाली पिऊन तर पहा,
तिला नाही म्हणू कशी?
बाई माझी एकादशी ।।४।।

अहो पण अशी एकादशी करून का फळ मिळणारे? म्हणून... 
तुम्ही एकादशी करा, 
आणि त्या विठ्ठलाचे स्मरण करा,
तरच, जागा मिळेल पायाशी,
बाई माझी एकादशी ।।५।।

Web Title: Nirjala Ekadashi 2024: Nirjala Ekadashi Alternatives Discovered by Housewives and taunting by spiritual poet; A must read!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न