Palmistry: तळहातावर तीळ मान, सन्मान, पैसा, प्रसिद्धी देतो, पण तो 'या' विशिष्ट जागीच असायला हवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:19 PM2022-12-27T17:19:31+5:302022-12-27T17:24:12+5:30

Palmistry: हस्तरेषेवरून भविष्य पाहतात हे आपल्याला माहीत आहेच, तळहातावरील तीळ तुमचे भाकीत तुम्हाला सांगेल, सविस्तर वाचा. 

Palmistry: A mole on the palm gives honor, money, fame, but it should be in 'this' specific place! | Palmistry: तळहातावर तीळ मान, सन्मान, पैसा, प्रसिद्धी देतो, पण तो 'या' विशिष्ट जागीच असायला हवा!

Palmistry: तळहातावर तीळ मान, सन्मान, पैसा, प्रसिद्धी देतो, पण तो 'या' विशिष्ट जागीच असायला हवा!

googlenewsNext

हस्तरेषेव्यतिरिक्त तळ हातावरील तीळदेखील जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टींचा उलगडा करतो. जसे की संपत्ती, प्रतिष्ठा, नोकरी तसेच लग्नाच्या विषयी अनेक गोष्टींचा त्यातून खुलासा होतो. आपण जाणून घेऊया काही प्रमुख आणि प्राथमिक गोष्टी!

हातावरील रेषा, उंचवटे, शरीरावरील जन्मखूणा आणि तीळ देखील बरेच संकेत देतात. हे दोन्ही शुभ आणि अशुभ असू शकतात. इथे मात्र आपण तळहातावरील तिळाबद्दल जाणून घेत आहोंत. तळ हातावरील तीळ सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा, मान सन्मान, पैसा संपत्ती याबाबत सूचना देतो. 

छोट्या बोटावरील अर्थात करंगळीवरील तीळ: करंगळीवर तीळ असणे खूप शुभ आहे. पैशाच्या बाबतीत असे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना कधीही पैशाची कमतरता नसते. आयुष्यातील अनेक अडचणींवर ते आपल्याजवळील श्रीमंतीने मात करू शकतात. 

मध्यम बोटावरील तीळ: मध्यम बोटावरील तीळ भाग्यकारक समजला जातो. या लोकांच्या जीवनात आनंद आणि संपत्ती दोन्हीची कमतरता नसते. 

मध्यम बोटाखाली तीळ: मध्यम बोटावर असलेला तीळ आनंद व मालमत्ता देते परंतु त्याच बोटाखाली तीळ असणे अपयश दर्शवते. मधल्या बोटाला जोडून असलेल्या तळहाताच्या उंचवट्याच्या क्षेत्राला शनि पर्वत म्हणतात. तिथे तीळ असणे, म्हणजे सर्व कार्यात विलंब झालाच म्हणून समजा. 

अनामिका : करंगळीच्या बाजूचे बोट, त्याला आपण अनामिका म्हणतो, तर इंग्रजीत 'रिंग फिंगर' अशी त्या बोटाची ओळख आहे.  रिंग फिंगरच्या खाली तीळ असल्यास सामाजिक, सरकारी कामात किंवा  संबंधित कामात आणि नोकरीमध्ये अडचण दर्शवते. त्यात खोटे बोलण्याची सवय असेल तर खोटेपणामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा मलीन होते किंवा अशा व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकले जाते.. अशा व्यक्तीला आपल्या जीवनात पोलीस आणि कोर्ट कार्यालयाचे उम्बरठे झिजवावे लागतात. 

चंद्रपर्वतवरील तीळ: आपल्या दोन्ही हातांना जोडून पाहिल्यावर दोन्ही हातावरील रेषांचा जोडून अर्धचंद्र तयार होतो.  या चंद्रावर तिळाची उपस्थिती मानसिक अस्थिरता दर्शवते.  हा तीळ त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठीसुद्धा चांगला नाही. असे लोक प्रेमात अपयशी ठरतात. लग्न ठरण्यासही त्यांना बराच विलंब होतो. हा तीळ वडीलधाऱ्या लोकांच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचवतो. 

Web Title: Palmistry: A mole on the palm gives honor, money, fame, but it should be in 'this' specific place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.