तुमच्या हातावर धनरेषा कुठे असते? जाणून घ्या 'असा' योग जो तुम्हाला बनवेल धनवान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 06:02 PM2022-02-09T18:02:21+5:302022-02-09T18:09:37+5:30
हाताच्या रेषाही आयुष्यात आर्थिक स्थिती कशी असेल हे सांगतात. जाणून घ्या तळहातावर पैशाची रेषा कुठे आहे आणि कोणते विशेष चिन्ह धन लाभ दर्शवतात.
हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातावर असलेल्या रेषा आणि चिन्हे जीवनाविषयी बरेच काही सांगून जातात. आरोग्य, कुटुंब, मुले, करिअर याशिवाय हाताच्या रेषाही आयुष्यात आर्थिक स्थिती कशी असेल हे सांगतात. जाणून घ्या तळहातावर पैशाची रेषा कुठे आहे आणि कोणते विशेष चिन्ह धन लाभ दर्शवतात.
हातावर कुठे असते धनरेषा?
हस्तरेषा शास्त्रानुसार करंगळीखाली बुध पर्वताचा प्रदेश आहे. करंगळीच्या खाली असलेल्या सरळ उभ्या रेषेला मनी लाईन म्हणतात. ज्या लोकांच्या तळहातावर ही रेषा असते ते खोल आणि स्पष्ट असतात. त्यांना आयुष्यात खूप पैसा मिळतो. तसेच असे लोक पैशाचा वापर खूप विचारपूर्वक करतात.
हातावर गजलक्ष्मी योग
हस्तरेषा शास्त्रानुसार दोन्ही तळहातांची भाग्यरेषा कंकणापासून सुरू होऊन थेट शनी पर्वतापर्यंत जाते. तसेच सूर्य रेषा स्पष्ट आणि सरळ असेल तर गजलक्ष्मी योग तयार होतो. गजलक्ष्मी योग संपत्तीचा कारक मानला जातो. अशा लोकांना अचानक आर्थिक लाभ होतो.
तराजूचं निशाण
तळहातावर तराजूचे चिन्ह असणे शुभ मानले जाते. हे चिन्ह भविष्यात पैशाची कमतरता भासणार नाही याची खूण आहे. ज्यांच्या तळहातावर हे चिन्ह असते, त्यांना लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो.
स्वस्तिकचं निशाण
हस्तरेषा शास्त्रानुसार हस्तरेखातील स्वस्तिक हे शुभाचे प्रतीक आहे. ज्या लोकांच्या तळहातावर हे चिन्ह असते, ते धनाच्या बाबतीत इतरांपेक्षा पुढे असतात. अशा लोकांना पैशाची कमतरता नसते