Parshuram Jayanti 2022 : आदिलशहाच्या बेगमने परशुरामांचे मंदिर का बांधले? परशुरामांना कोकणचा देव का म्हणतात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 01:00 PM2022-04-28T13:00:41+5:302022-04-28T13:01:06+5:30

Parshuram Jayanti 2022: धर्मपालन आणि धर्मसंस्थापना करणारे भगवान परशुराम यांच्या क्षात्र तेजाचा अनुभव आदिलशहाच्या बायकोनेही घेतला, तो असा...!

Parshuram Jayanti 2022: Why did Adilshah's Begum build Parshuram's temple? Why is Parshuram called the God of Konkan? Read on! | Parshuram Jayanti 2022 : आदिलशहाच्या बेगमने परशुरामांचे मंदिर का बांधले? परशुरामांना कोकणचा देव का म्हणतात? वाचा!

Parshuram Jayanti 2022 : आदिलशहाच्या बेगमने परशुरामांचे मंदिर का बांधले? परशुरामांना कोकणचा देव का म्हणतात? वाचा!

Next

शस्त्र आणि शास्त्रात पारंगत अशी भगवान परशुराम यांची ओळख आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. म्हणून ही तिथी भगवान परशुराम यांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते. त्यांच्या मातृ-पितृ भक्तीचे दाखले आजही दिले जातात. अधर्मीयांविरुद्ध युद्धास उभे ठाकून त्यांनी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली, असे पुराणात वर्णन आहे. याचाच अर्थ त्यांचे केवळ अधर्मी क्षत्रियांशी वैर होते. बाकी ते सज्जनांशी सज्जन आणि दुर्जनांशी दुर्जन होऊनच वागत असत. वैदिक धर्माचा, संस्कृतीचा प्रचार, प्रसार करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. 

असे म्हणतात की कोकणाच्या भुप्रदेशाची निर्मिती परशुरामानी समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाना सप्त कोकणाचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.

केरळची भुमी परशुरामाने निर्माण केली असे सांगत. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे. त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फुट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम असेच म्हणतात.

मंदिराच्या रचनेमध्ये मुगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी -

एकदा आदिल शहाच्या बेगमची ताटवे समुद्रात बुडाली होती. या बेगमला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस केला, की ताटवे परत आल्यास देऊळ बांधीन, त्यानंतर तिची ताटवे खरंच सुखरुपपणे किना-याला लागली आणि परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला.

आजही परशुरामांच्या कृपेमुळे समुद्रालगतचा समस्त प्रदेश सुखी, समाधानी, संपन्न आहे. म्हणून आजही अक्षय्य तृतीयेपासून तीन दिवस परशुरामाचा उत्सव साजरा केला जातो. आपणही त्यांच्याकडून बळ, बुद्धी, शक्ती, तेज मागुया आणि परशुराम जयंती साजरी करूया. 

Web Title: Parshuram Jayanti 2022: Why did Adilshah's Begum build Parshuram's temple? Why is Parshuram called the God of Konkan? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.