Pashankush Ekadashi 2022: विशेषतः एकादशीच्या तिथीला विष्णूसहस्त्रनामाचं पठण किंवा श्रावण केल्याने कोणकोणते लाभ होतात, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 11:25 AM2022-10-06T11:25:10+5:302022-10-06T11:25:36+5:30

Pashankush Ekadashi 2022: पाशांकुश एकादशीच्या निमित्ताने आज दिवसभरात विष्णुसहस्त्र नामाचे एकदा तरी श्रवण किंवा पठण अवश्य करा आणि त्याचे लाभ मिळवा!

Pashankush Ekadashi 2022: Know the benefits of reciting Vishnu Sahasranama or Shravan especially on the date of Ekadashi! | Pashankush Ekadashi 2022: विशेषतः एकादशीच्या तिथीला विष्णूसहस्त्रनामाचं पठण किंवा श्रावण केल्याने कोणकोणते लाभ होतात, जाणून घ्या!

Pashankush Ekadashi 2022: विशेषतः एकादशीच्या तिथीला विष्णूसहस्त्रनामाचं पठण किंवा श्रावण केल्याने कोणकोणते लाभ होतात, जाणून घ्या!

googlenewsNext

विष्णुसहस्रनाम या स्तोत्रात भगवान महाविष्णुंच्या १००० नावांचा उल्लेख आहे. एकादशी तिथीबरोबरच अधिक फलप्राप्तीसाठी रोज सायंकाळी विष्णुसहस्रनाम म्हटले किंवा ऐकले तर त्याचे अनेक लाभ होतात, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ!

ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णुंच्या १००० नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तीभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या 'अनुशासनपर्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. 

विष्णुसहस्रनामाचा महाभारतातील उल्लेख : 

शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठीराने विचारले, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता, मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि कोणत्या दैवताचा जप केला, तर मनुष्य जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो?

त्यावर भीष्माचार्य म्हणाले, 'भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता, मनुष्य हरतऱ्हेच्या दु:खावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे. प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे. मन:शांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भिष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्णदेखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते. 
 
महाभारत रचैते महर्षी व्यास यांनीदेखील सांगितले आहे, की 'जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. 

जगद्गुरु शंकराचार्यदेखील या स्तोत्राला दुजोरा देताना म्हणतात,

>> भगवद्गीता आणि विष्णुसहस्रनामाचे पारायण करा.

>> भगवंताचे चिंतन करा.

>> सत्संग करा. 

>> दीनजनांना दान करा. 

या चार गोष्टी केल्यामुळे आयुष्य सोपे होईल. 

विष्णुसहस्रनामाचे फायदे : 

>> आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो. 

>> गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात. 

>> ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.

>> मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो. 

विष्णुसहस्रनामाचे पठण कसे व कधी करावे?

कोणत्याही स्तोत्राचे पठण व स्पष्ट उच्चार अतिशय महत्त्वाचे असतात. तरच, स्तोत्राचा योग्य परिणाम होतो. हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तना-मनावर सकारात्मक बदल दिसून येतात. 

>> स्तोत्र पाठ नसेल, तर युट्यूबवर विष्णुसहस्रनामाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. रोज सायंकाळी दिवेलागण झाली, की मोठ्या आवाजात हे स्तोत्र लावावे. विशेषत: दक्षिणेकडील प्रख्यात गायिका एम.एस. सुब्बालक्ष्मी यांनी म्हटलेले विष्णुसहस्रनाम मंत्रमुग्ध करते.

>> स्तोत्र केवळ कानावर पडून उपयोग नाही. त्याचे शब्द डोळ्यांसमोर असले, तर लक्ष विचलित होत नाही. म्हणून स्तोत्र श्रवणाबरोबर हातात पोथी घेऊन त्याचे नित्य पठणही करावे. म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते. 

>> अधिक मासात १०८ वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास, अधिक लाभ होतो असा भाविकांना अनुभव आला आहे. 

>> सत्यनारायण पूजेत विष्णुसहस्रनाम घेतले जाते. म्हणून अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनाराण पूजेचे आयोजन केले जाते.

Web Title: Pashankush Ekadashi 2022: Know the benefits of reciting Vishnu Sahasranama or Shravan especially on the date of Ekadashi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.