तुमच्याही घरात मोरपिस आहे? व्हाल संकटमुक्त; सुख-समृद्धी वृद्धीस उपयुक्त; पाहा, फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:35 AM2022-05-18T11:35:08+5:302022-05-18T11:36:19+5:30

श्रीकृष्णाने आजन्म धारण केलेल्या मोरपिसाचे ज्योतिषशास्त्रात काही उपाय, फायदे सांगितले जातात. जाणून घ्या...

peacock feather astrology remedies for money wealth and prosperity mor pankh pisache fayde | तुमच्याही घरात मोरपिस आहे? व्हाल संकटमुक्त; सुख-समृद्धी वृद्धीस उपयुक्त; पाहा, फायदे

तुमच्याही घरात मोरपिस आहे? व्हाल संकटमुक्त; सुख-समृद्धी वृद्धीस उपयुक्त; पाहा, फायदे

googlenewsNext

ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा असून, त्या त्या शाखेत संबंधित बाबींचा अभ्यास करून काही गोष्टींचा अंदाज बांधता येऊ शकतो. यामध्ये अंकशास्त्र, हस्तशास्त्र, समुद्रशास्त्र, वास्तूशास्त्र, स्वप्नशास्त्र या ज्योतिषशास्त्राच्या शाखांमधून मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास करून त्याच्याशी निगडीत गोष्टींचा ऊहापोह केला जाऊ शकतो. जीवनात काही समस्या येत असतील, तर त्यासाठी काही उपाय सूचवले जातात. (peacock feather astrology remedies)

ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची असते. कारण यामुळे व्यक्तीला जीवनात यशाच्या मार्गावर पुढे जाताना सुख-समृद्धी प्राप्त होते. दुसरीकडे, जर ग्रह अनुकूल नसतील तर तुम्हाला पैसा, नातेसंबंध, व्यवसाय, आरोग्य इत्यादींशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी असे मानले जाते की मोराच्या पिसांचे हे काही उपाय जीवनातील अडचणी दूर करून सुख-समृद्धी वाढवण्यास मदत करतात. (mor pankh pisache fayde)

मोरपिसाचे काही फायदे आणि उपाय

- ज्योतिषशास्त्रानुसार संपत्ती वृद्धीसाठी किंवा तुमची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी राधा-कृष्णाच्या मंदिरात जावे आणि मोरपिस अर्पण करावे. काही दिवसांनी ते मोरपिस काढून तुमच्या तिजोरीत ठेवा, असे केल्याने काहीसा दिलास मिळू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

- तुम्हाला कार्यालयात वा कार्यक्षेत्रात हितशत्रू, विरोधकांचा त्रास सहन करावा लागत असेल आणि ते तुमच्यावर वरचढ होऊ नयेत, असे वाटत असेल, तर तर हनुमंतांना सिंदूर अर्पण करावे. तसेच मोरपिस वाहावे. दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. मंगळवार आणि शनिवारी हा उपाय करणे शुभ असल्याचे म्हटले जाते. 

- ज्योतिषशास्त्रानुसार घरातील पुजेच्या ठिकाणी धार्मिक ग्रंथांच्या पुस्तकांमध्ये मोराची पिसे ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि त्याचबरोबर घरातील कलहापासून मुक्ती मिळते.

- असे मानले जाते की, घरात असलेले वास्तू दोष तिथल्या लोकांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो. अशा वेळी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्रासह दोन मोराची पिसे लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतो, अशी मान्यता आहे. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: peacock feather astrology remedies for money wealth and prosperity mor pankh pisache fayde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.