टक्कल असलेली माणसे श्रीमंत असतात म्हणे; पण हे खरंय का? शास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 06:05 PM2022-01-06T18:05:24+5:302022-01-06T18:06:28+5:30

समुद्रशास्त्रानुसार सरधोपटपणे अनुमान काढले जाते. परंतु ते प्रत्येकाला तंतोतंत लागू होईलच असे नाही. प्रत्येकाची ठेवण वेगळी, प्रत्येकाचे भाग्य वेगळे.

People with baldness are said to be rich; But is this true? The scriptures say ... | टक्कल असलेली माणसे श्रीमंत असतात म्हणे; पण हे खरंय का? शास्त्र सांगते...

टक्कल असलेली माणसे श्रीमंत असतात म्हणे; पण हे खरंय का? शास्त्र सांगते...

googlenewsNext

मनुष्याच्या चेहरेपट्टीवरून शास्त्रज्ञांनी अनुभवाने बरेच आडाखे बांधले आहेत. कपाळ मोठे असणे, नाक तरतरीत असणे, गालाला खळी पडणे वगैरे शुभ लक्षण मानतात. त्याउलट उंच माणसे, तिरळी माणसे, जाड ओठ असलेली माणसे दुर्दैवी असतात असेही संकेत आहेत. पण असा अनुभव प्रत्येक वेळी येईल असे नाही. लेखक अ.ल.भागवत `परम सुखाचे रहस्य' या पुस्तकात लिहितात...

टक्कल असलेला माणूस सामान्यत: श्रीमंत असतो, असा एक प्रवाद आहे. एका हिप्पीने श्रीमंत टकल्या माणसाकडे पाहून `खल्वाटो निर्धनो क्वचित' अशी म्हण तयार केली. या समजुतीत काहीच अर्थ नाही. अनेक टकल्या व्यक्ती दरिद्री अवस्थेत आढळतात. याउलट खूप केस असलेल्या व्यक्ती बड्या श्रीमंत असतात असेही दिसते. 

समुद्रशास्त्रानुसार सरधोपटपणे अनुमान काढले जाते. परंतु ते प्रत्येकाला तंतोतंत लागू होईलच असे नाही. प्रत्येकाची ठेवण वेगळी, प्रत्येकाचे भाग्य वेगळे. म्हणून एकच विचार सगळीकडे समान लागू होत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. व्यक्तिपरत्वे समुद्रशास्त्राचे निदान बदलते. त्यामुळे आपण लोकसमजुतींवर अवलंबून न राहता मेहनत करून श्रीमंत होण्यावर भर दिला पाहिजे. 

थोडक्यात शरीरावरील चिन्हांचा व श्रीमंतीचा अर्थाअर्थी संबंध नाही किंवा लक्ष्मी मातेला टक्कल पडलेले बाळ आवडते असा कुठेही पुराणात उल्लेख नाही. एक अनुमान काढले, तर मात्र लक्षात येईल, की केसाळ माणसापेक्षा टक्कल असलेला माणूस जास्त व्यवहारदक्ष, समंजस व शांत स्वभावाचा असतो. 

बाकी श्रीमंतीचा व टकलाचा खरोखर काही संबंध असता तर तरुण माणसे म्हणाली असती, `देवा तुझी संपत्ती नको पण आम्हाला टक्कल पडू दे!'

Web Title: People with baldness are said to be rich; But is this true? The scriptures say ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.