Meen Rashi Bhavishya 2022: मीन रास वार्षिक राशीभविष्य: नोकरीत पदोन्नती, करिअरमध्ये वृद्धी; कशी सुरु होईल साडसाती?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 12:30 PM2021-12-31T12:30:14+5:302021-12-31T12:32:08+5:30
Meen Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष मीन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक राहू शकेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनावर ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया...
मीन राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२२ हे वर्ष अनुकूल राहील. या वर्षी तुम्ही आर्थिक स्वरूपात संपन्न राहाल. खास करून एप्रिल महिन्यात तुमच्यासाठी कमाईचे नवीन स्रोत उत्पन्न होतील. या व्यतिरिक्त, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये ग्रहांचे होणारे स्थान परिवर्तन तुमच्या जीवनात बरेच आर्थिक चढ उतार घेऊन येईल तसेच, करिअरच्या दृष्टीने मीन राशीतील व्यक्तींच्या इच्छेनुसार परिणाम प्राप्त होऊ शकतील. एप्रिल महिन्यात मीन राशीमध्ये गुरुचे संक्रमण हे कार्यस्थळी तुम्हाला आपल्या सहकर्मींसोबत उत्तम संबंध स्थापित करण्यात मदत करेल. यामुळे तुमची पदोन्नती होईल आणि तुम्ही वेतन वृद्धी प्राप्त करण्यास सक्षम ठराल.
विद्यार्थ्यां विषयी बोलायचे झाल्यास, वृश्चिक राशीमध्ये होत असलेले मंगळाचे संक्रमण शिक्षणात त्यांना सकारात्मक परिणाम देऊ शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उत्तम प्रदर्शन करून आपल्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यात यशस्वी होऊ शकतील. तसेच, कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला आपल्या कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. तसेच, आरोग्याच्या दृष्टीने मे महिन्यापासून ते ऑगस्टपर्यंत तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घेण्याची सर्वाधिक आवश्यकता ठरणार आहे.
या वर्षी मे महिन्यात तीन ग्रह म्हणजे मंगळ, शुक्र आणि गुरु यांच्या युतीने तुम्हाला आपल्या कुटुंब आणि मोठ्यांचा आशीर्वाद देणारे आहे. दांपत्य जीवन पाहिल्यास हे वर्ष विवाहित जातकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. वर्षाच्या सुरवातीपासून मार्चपर्यंत उत्तम दांपत्य जीवनाचा आनंद घेता येऊ शकेल. २१ एप्रिलनंतर तुमच्या विवाहित जीवनात नवीन गोष्टी घडू शकतील.
तसेच, मीन राशीच्या प्रेमी जातकांसाठी हे वर्ष सामान्य राहणार आहे. परंतु, ग्रहांचे परिवर्तन कुणी तिसऱ्या व्यक्तीचे अचानक तुमच्या नात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे कारण बनेल. या वर्षी खासकरून सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये लहान मोठ्या मुद्द्यांना घेऊन आपल्या जोडीदाराबरोबर वाद करणे टाळले पाहिजे.
सन २०२२ तुमच्यासाठी सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे आणि या वर्षी तुमच्या नातेवाईकांसोबत संबंध मधुर राहू शकतात.