Pitru Paksha 2021: पितृपक्षात जुळून येतोय दुर्मिळ गजछाया योग; पाहा, पुराण आणि शास्त्र काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:58 AM2021-10-05T07:58:55+5:302021-10-05T07:59:39+5:30

Pitru Paksha 2021: सर्वपित्री अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya) दिवशी दुर्मिळ मानला जाणारा गजच्छायायोग (Gajachchhaya Yoga) जुळून येत आहे.

pitru paksha 2021 know about rare and amazing gajachaya yog on sarva pitru amavasya 2021 | Pitru Paksha 2021: पितृपक्षात जुळून येतोय दुर्मिळ गजछाया योग; पाहा, पुराण आणि शास्त्र काय सांगते

Pitru Paksha 2021: पितृपक्षात जुळून येतोय दुर्मिळ गजछाया योग; पाहा, पुराण आणि शास्त्र काय सांगते

Next

मराठी वर्षातील अन्य सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांच्याप्रमाणे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या पितृ पंधरवड्यालाही (Pitru Paksha 2021) तेवढेच महत्त्व आहे. आता काहीच दिवसात पितृपक्षाची सांगता होऊन नवरात्राला सुरुवात होईल. मात्र, यंदाच्या वर्षी सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी गजच्छायायोग (Gajachchhaya Yoga 2021 Date) जुळून येत आहे. याला गजछाया योग असेही म्हटले जाते. हा योग अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया... 

यंदाच्या वर्षी म्हणजेच ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सर्वपित्री अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya 2021) दिवशी दुर्मिळ मानला जाणारा गजच्छायायोग जुळून येत आहे. हा योग केवळ पितृपक्षात जुळून येतो, अशी मान्यता आहे. या योगाच्या कालावधीत पिंडदान, तर्पण, श्राद्ध विधी करणे उत्तम मानले जाते. यामुळे पितर तृप्त आणि प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. हा योग प्रत्येक वर्षी येतोच असे नाही. नक्षत्र संयोग आणि ग्रहांचे नक्षत्रातील भ्रमण यामुळे गजच्छायायोग जुळून येतो. (Gajachaya Yog 2021 Date)

कोणत्या पुराणात काय उल्लेख?

सूर्य आणि चंद्र दोन्ही ज्यावेळेस हस्त नक्षत्रात असतात, तेव्हाच हा योग जुळून येतो. (Gajachaya Yog Importance) सूर्यावर राहु किंवा केतुची दृष्टी पडल्यावर हा योग येतो. पितृपक्षातील भाद्रपद वद्य त्रयोदशी किंवा अमावास्या या दरम्यान हा योग येतो. यावर्षी हा योग सर्वपित्री अमावास्येला येत आहे. यापूर्वी सन २०१८ मध्ये सर्वपित्री अमावास्येला अशा प्रकारचा योग जुळून आला होता. या योगाबाबत स्कंदपुराण, अग्निपुराण, मत्स्यपुराण, वराहपुराण यासह महाभारतात उल्लेख आढळून येतो. या योगावर पिंडदान, श्राद्ध, तर्पण विधी केल्यास कमीत कमी १३ वर्षांपर्यंत पितर किंवा पूर्वज तृप्त आणि प्रसन्न राहतात, अशी मान्यता आहे. (Significance of Gajachaya Yoga in Marathi)

सर्वपित्री अमावास्येचे महत्त्व 

वर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे सांगितले जाते. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यात येतो. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते. गजच्छायायोगात गया, पुष्कर, हरिद्वार, बद्रीनाथ आणि प्रयागराज येथे श्राद्ध विधी, तर्पण, पिंडदान करणे उत्तम मानले जाते. तसेच या ठिकाणी देशभरातून पितृपक्षातील विधी करण्यासाठी श्रद्धाळू जात असतात. 
 

Web Title: pitru paksha 2021 know about rare and amazing gajachaya yog on sarva pitru amavasya 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.