Pitru Paksha 2021 : काही केल्या नैवेद्याला कावळा शिवत नसेल तर पर्याय काय, वाचा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:51 AM2021-09-30T11:51:19+5:302021-09-30T11:52:14+5:30

Pitru Paksha 2021 : कोणत्याही परिस्थितीत काकस्पर्श न झाल्याचे कारण सांगून नैवेद्य तसाच सोडून जाऊ नये. तसे करणे शास्त्राविरुद्ध ठरते.

Pitru Paksha 2021: What is the alternative if the crow does not eat some of the offerings, read ...! | Pitru Paksha 2021 : काही केल्या नैवेद्याला कावळा शिवत नसेल तर पर्याय काय, वाचा...!

Pitru Paksha 2021 : काही केल्या नैवेद्याला कावळा शिवत नसेल तर पर्याय काय, वाचा...!

googlenewsNext

काहीवेळा प्रयत्नांची शर्थ करूनही नैवेद्याला काकस्पर्श होत नाही. अशावेळी दर्भाचा कावळा करून त्याचा स्पर्श करवला जातो. शास्त्राने तात्पुरती तरतूद करून ठेवली असली, तरी या घटनेमुळे किंवा नंतर घडलेल्या काही दखलपात्र घटनांमुळे मनाला अस्वस्थता आली तर अब्दपूर्तीनंतर नारायणबली करावा. परंतु कोणत्याही परिस्थितीत काकस्पर्श न झाल्याचे कारण सांगून नैवेद्य तसाच सोडून जाऊ नये. तसे करणे शास्त्राविरुद्ध ठरते.

याउलट नैवेद्य ठेवल्यार त्याला काकस्पर्श होत असेल तर ते हे शुभचिन्ह मानले जाते. याबाबत  पुढे दिलेली शुभ चिन्हे पितरांच्या कृपाशिर्वादाची तुम्हाला साक्ष पटवून देतील. 

>>जर कावळ्यासाठी, कुत्र्यांसाठी, गायींसाठी ठेवलेले अन्न ते क्षणाचाही विलंब न करता खात असतील, तर हे लक्षण आहे की पूर्वज तुमच्यावर समाधानी आहेत आणि ते तुम्ही दिलेले अन्न स्वीकारत आहेत. तसेच तुमची सेवा त्यांच्यापर्यंत यथायोग्य पोहोचत आहे. 

>>पितृ पक्षाच्या वेळी घराच्या छतावर येणारे आणि खिडकीत डोकावणारे कावळे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. अन्यथा अनेक घरात असाही अनुभव येतो, की नेहमी येणारे कावळे पितृपक्षात घराकडे फिरकत सुद्धा नाहीत. मात्र तुमचे घर त्याला अपवाद असेल तर तुमची श्रद्धा आणि श्राद्ध याचे ते फलित आहे असे समजायला हरकत नाही. हे एकार्थी भरभराटीचे लक्षण आहे. 

>>कावळा आपल्या चोचीतून काड्या, पाने नेताना  दिसला, तर ते पैसे मिळण्याचेही लक्षण आहे. या व्यतिरिक्त, जर कावळा फुले आणि पाने आणताना दिसला, तर याचा अर्थ असा की तुम्ही पूर्वजांकडून जे काही मागाल, ती इच्छा पूर्ण होईल. 

Web Title: Pitru Paksha 2021: What is the alternative if the crow does not eat some of the offerings, read ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.