Pitru Paksha 2023: गजलक्ष्मीची कायमस्वरूपी कृपा राहावी म्हणून आजच विकत आणा 'ही' एक वस्तू!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 02:24 PM2023-10-05T14:24:50+5:302023-10-05T14:25:23+5:30

Gajalaxmi Vrat 2023: भाद्रपद कृष्ण अष्टमीला गजलक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे, या व्रताचे फळ मिळावे म्हणून वास्तू शास्त्राने सांगितलेल्या उपायाची जोड द्या!

Pitru Paksha 2023: Buy 'this' item today to be blessed by Gajalakshmi forever! | Pitru Paksha 2023: गजलक्ष्मीची कायमस्वरूपी कृपा राहावी म्हणून आजच विकत आणा 'ही' एक वस्तू!

Pitru Paksha 2023: गजलक्ष्मीची कायमस्वरूपी कृपा राहावी म्हणून आजच विकत आणा 'ही' एक वस्तू!

googlenewsNext

पितृपक्षाच्या अष्टमीला महालक्ष्मी व्रत साजरे केले जाते. हे व्रत दिवाळीतल्या लक्ष्मीपूजेइतके महत्त्वाचे मानले जाते. पितरांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, वैभवलक्ष्मी नांदावी यासाठी पितृपक्षाला जोडून देवीच्या आवडत्या अष्टमी तिथीला हे व्रत केले जाते. या व्रताला गजलक्ष्मी व्रत असेही म्हणतात. उत्तर भारतात हे व्रत मोठ्या प्रमाणात केले जाते. यंदा ६ ऑक्टोबर रोजी ही पूजा करायची आहे. ही पूजा तिन्ही सांजेला केली जाते. 

या व्रताचे अधिक फळ मिळावे आणि आपल्या वास्तुवर गजलक्ष्मीची कायमस्वरूपी कृपा राहावी म्हणून आज पुढील टिप्स नक्की वापरा. गजलक्ष्मी अर्थात गज म्हणजेच हत्तीवर स्वार झालेली लक्ष्मी! ही लक्ष्मी हत्तीच्या सोंडेने भरभरून कृपाशिर्वाद देते. म्हणून तिचे वाहन गज याचीही आज पूजा केली जाते. यालाच जोड दिली आहे फेंगशुई वास्तू शास्त्राने. फेंगशुईनुसार, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना घरात ठेवल्याने आयुष्य सकारात्मक वळण घेऊ लागते आणि अनेक चांगल्या घटना आयुष्यात घडू लागतात. यामुळे कुटुंबाला आर्थिक बळ तर मिळतेच पण आरोग्यही चांगले राहते. आज जाणून घेणार आहोत गजमूर्ती ठेवण्याचे फायदे. 

श्रीगणेशाची कृपा राहते

शास्त्रांमध्ये हत्तीला यश आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, त्या घरावर गणेशाची कृपा राहते. हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे. पूर्वी राजे महराजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत असत. आताच्या काळात हत्ती पाळणे जरी शक्य नसले तरी हत्तीची पितळ्याची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपल्याला घरात नक्कीच आणता येईल. त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभव प्राप्तीकडे नेईल. 

आर्थिक संकटातून सुटका 

जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढत असेल, तर नवीन वर्षात हत्तीच्या दोन मूर्ती आणा. दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दारात ठेवा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू लागतो.

फेंगशुईमध्ये हत्ती ठेवण्याचे नियम आहेत

लक्षात ठेवा की काळ्या रंगाचा हत्तीचा पुतळा कधीही खरेदी करू नका. हा रंग शोक आणि दु:खाचे प्रतीक आहे, ज्यामुळे घरातील इतर सदस्य देखील संकटात सापडतात. त्याऐवजी पांढऱ्या रंगाचा हत्ती खरेदी करणे चांगले मानले जाते. यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. पांढरा हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंगाचा हत्ती आणा, मात्र काळा हत्ती आणू नका. 

मूर्तींचे मुख या दिशेला ठेवावे

तुम्ही हत्तींची जोडी खरेदी करत असाल, तर ते एकमेकांसमोर उभे राहणार नाहीत याची काळजी घ्या. असे केले नाही तर घरात कलह आणि भांडणाचे वातावरण निर्माण होते. म्हणूनच त्यांना नेहमी बाजूबाजूला उभे केले पाहिजे. हत्तीची मूर्ती खरेदी केल्यावर ती नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावी.

Web Title: Pitru Paksha 2023: Buy 'this' item today to be blessed by Gajalakshmi forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.