पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 02:05 PM2024-09-19T14:05:49+5:302024-09-19T14:06:37+5:30
Pitru Paksha 2024: तिथीनुसार श्राद्ध विधी करताना काही मंत्र म्हणणे उपयुक्त मानले गेले आहे.
Pitru Paksha 2024: मराठी वर्षातील चातुर्मास सुरू आहे. भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत पितृपक्ष, पितृ पंधरवडा साजरा केला जातो. यातील तिथींना पितरांच्या नावाने श्राद्ध विधी केला जातो. कुटुंबीयांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्यांचे श्राद्ध, पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची परंपरा आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.
पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे शास्त्र सांगते. देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असे उपनिषदे सांगतात. देवतांप्रमाणे पितरांमध्ये आशीर्वाद देण्याची शक्ती असते, असे सांगितले जाते. आपल्या पूर्वजांचा मृत्यू कोणत्या तिथीला झाला, याची माहिती नसल्यास अशा सर्वांचा श्राद्ध विधी सर्वपित्री अमावास्येला केला जातो. तिथीनुसार श्राद्ध विधी करताना काही मंत्र म्हणणे उपयुक्त मानले गेले आहे.
पितरांची पूजा करताना कोणते मंत्र म्हणावेत?
- ॐ पितृ देवतायै नमः
- ॐ आगच्छन्तु में पितर एवं ग्रहन्तु जलान्जलिम
- ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय च धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात।
- ॐ पितृगणाय विद्महे जगत धारिणी धीमहि तन्नो पितृो प्रचोदयात्।
- ॐ देवताभ्य: पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च
- ॐ पितृगणाय विद्महे जगत धारिणी धीमहि तन्नो पितृो प्रचोदयात्।
- ॐ देवताभ्य: पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च। नम: स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नम:।
- ॐ आद्य-भूताय विद्महे सर्व-सेव्याय धीमहि। शिव-शक्ति-स्वरूपेण पितृ-देव प्रचोदयात्।
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.