पितृपक्ष अष्टमी: ‘या’ ५ गोष्टी करा, अष्टलक्ष्मीचा शुभाशिर्वाद मिळेल; सुख-समृद्धी वैभव वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:15 PM2023-10-04T15:15:21+5:302023-10-04T15:16:13+5:30

Pitru Paksha 2023 Ashtami Vrat: पितृपक्षातील अष्टमीला लक्ष्मीपूजनाने अनेक लाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते.

pitru pandharwada 2023 do these 5 things and tips to get lakshmi devi blessings prosperity on pitru paksha ashtami 2023 | पितृपक्ष अष्टमी: ‘या’ ५ गोष्टी करा, अष्टलक्ष्मीचा शुभाशिर्वाद मिळेल; सुख-समृद्धी वैभव वाढेल!

पितृपक्ष अष्टमी: ‘या’ ५ गोष्टी करा, अष्टलक्ष्मीचा शुभाशिर्वाद मिळेल; सुख-समृद्धी वैभव वाढेल!

googlenewsNext

Pitru Paksha 2023 Ashtami Vrat: ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी पितृपक्षातील अष्टमी आहे. शुक्रवारी अष्टमी तिथी येत असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले असून, देवी लक्ष्मीच्या पूजनाने पुण्यप्राप्ती होऊ शकते, असे म्हटले जाते. काही ठिकाणी या दिवशी गजलक्ष्मी स्वरुपातील लक्ष्मीचे पूजन केले जाते. पितृपक्ष पंधवड्याबाबत अनेक समजुती आपल्याकडे आहेत. पितृपंधरवड्यात मुंज, विवाह, वास्तुशांती यांचे मुहूर्त नसतात. मात्र, काही कार्ये केले जाऊ शकतात, असे म्हटले जाते. पितृपक्षातील अष्टमीला गजलक्ष्मी स्वरुपातील लक्ष्मी देवीचे पूजन करणे शुभ-पुण्यदायक मानले गेले आहे. लक्ष्मी देवीच्या पूजनासह काही उपाय केल्यास अष्टलक्ष्मीचा शुभाशिर्वाद मिळून, धन-धान्य, सुख-समृद्धी, वैभवात वाढ होऊ शकते, असे म्हटले जाते. 

भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील म्हणजे पितृपक्ष पंधरवड्यातील अष्टमी तिथी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. देशभरातील अनेक साधक संपूर्ण वर्षभर या तिथीची आतुरतेने वाट पाहत असतात, असे सांगितले जाते. विशेष करून आर्थिक लाभ आणि उन्नतीची मनोकामना असणाऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. शास्त्रांनुसार, राधाष्टमीपासून ते भाद्रपद वद्य अष्टमीपर्यंतचा कालावधी सुरैया पर्व म्हणून ओळखला जातो. राधाष्टमी ते भाद्रपद वद्य अष्टमीच्या काळात साधना करू न शकणाऱ्या साधकांनी सुरैया पर्वाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच भाद्रपद वद्य अष्टमीला लक्ष्मी देवी आणि कुबेर यांचे पूजन करावे. भाद्रपद अष्टमी तिथी लक्ष्मी व्रतासाठी विशेष मानली जाते, असे सांगितले जाते. 

गजलक्ष्मी कृपेने धनहीन झालेला इंद्र धनवान बनला

समुद्रमंथनावेळी लक्ष्मी देवी प्रकट झाली होती. यावेळी ऐरावताने लक्ष्मी देवीवर जलाभिषेक केला, तेव्हापासून तिला गजलक्ष्मी संबोधले गेले. शास्त्रांनुसार गजलक्ष्मी व्रतामुळे विशेष लक्ष्मी देवीचे विशेष कृपाशिर्वाद लाभतात. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, अशी लक्ष्मी देवीची विविध रुपे मानली जातात. गजलक्ष्मीच्या कृपेने गरीब माणूसही धनवान होऊ शकतो. जसे दुर्वासा ऋषींनी दिलेला शापामुळे धनहीन झालेला इंद्र पुन्हा धनवान झाला, अशी मान्यता आहे.

श्रीयंत्र अन् कुबेर पूजन

धन, धान्यप्राप्तीसाठी लक्ष्मी देवीची उपासना करणारे गजलक्ष्मीचे व्रत आवर्जुन आचरतात. व्रतपूजनात लक्ष्मी देवीच्या दोन्ही बाजूला गजराजाची स्थापना करावी. याशिवाय कुबेराची स्थापनाही करावी. लक्ष्मी देवीसमोर श्रीफळ, शंख, कौडी, सोने-चांदीची नाणी आणि श्रीयंत्र ठेवावे. श्रीयंत्र नसल्यास एका कागदावर लाल शाईने श्रीयंत्राची प्रतिकृती रेखाटून तो कागद लक्ष्मी देवीसमोर ठेवावा, असे सांगितले जाते. या व्रताचरणात गजलक्ष्मी व्रतकथा अवश्य ऐकावी किंवा तिचे पठण करावे, असेही आवर्जुन सांगितले जाते.

गजलक्ष्मी देवीचा प्रभावशाली मंत्र आवर्जून म्हणावा

गजलक्ष्मी व्रतपूजन करताना लाल रंगाच्या वातीने तुपाचा दिवा लक्ष्मी देवीला अर्पण करावा. खीर, मिसरी आणि मधाचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा. या व्रतात देवीला गुलाब, कमळ अशी फुले प्राधान्याने अर्पण करावीत. 'ओम ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये गजलक्ष्मी नमः' या मंत्राने पूजा ठिकाणी ठेवलेले विशेष साहित्य मंत्रवून घ्यावेत. यानंतर लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. गजलक्ष्मी व्रतपूजनानंतर सोने-चांदीची नाणी, कौडी लाल वस्त्रात बांधून तिजोरी किंवा कपाटात ठेवावी. लक्ष्मी देवीची नियमित पूजा करावी, असे सांगितले जाते.

अष्टलक्ष्मीचे शुभाशिर्वाद मिळतील

लक्ष्मी देवीची विविध रूपे वाहन, वेशभूषा, हात आणि शस्त्राने ओळखली जातात. महालक्ष्मी, स्वर्गलक्ष्मी, राधाजी, दक्षिणा, गृहलक्ष्मी, शोभा, सुरभी म्हणजेच रुक्मणी आणि राजलक्ष्मी म्हणजे सीता, असे आठ अवतार लक्ष्मी देवीचे मानले जातात. पशू धन दात्री देवीला गजलक्ष्मी, असे म्हटले जाते. पशूंमध्ये हत्तीला राजसी मानले आहे. गजलक्ष्मीने इंद्र देवाला समुद्रात दडलेले हरवलेले धन मिळवण्यात मदत केली होती, असे सांगितले जाते. गजलक्ष्मीचे वाहन पांढरा हत्ती आहे.

- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.

 

Web Title: pitru pandharwada 2023 do these 5 things and tips to get lakshmi devi blessings prosperity on pitru paksha ashtami 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.